Corona Updates : महाराष्ट्रासह 6 राज्यात 84.04 % नवीन केसेस; ‘या’ चार राज्यात 24 तासांत एकही नवीन केस नाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कोरोना विषाणू पुन्हा एकदा पसरू लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १५ हजार ३८८ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. या काळात ६ राज्यात कोरोना केसेस झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, अशी राज्यं आहेत जिथे ८४.०४% नवीन रुग्णसंख्या आहे.

भारताने कोरोना व्हॅक्सीनेशनसाठी मोलाचे पाऊल उचलले आहे. गेल्या २४ तासांत २० लाखांपेक्षा अधिक लसी दिल्या गेल्या आहेत. यासह कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १२ लाख ४४ हजार १८६ झाली आहे. देशामध्ये कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण एकूण १ लाख ८७ हजार ४६२ झाले आहेत. एकूण केसेसपैकी ५७ हजार ९३० लोकांचा मृत्यू झाला आहे. या महामारीमुळे सोमवारी ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत १५ हजारपेक्षा अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण मिळाले आणि १६,६०६ बरे झाले.

‘या’ राज्यात गेल्या २४ तासांत एकही केस मिळाली नाही

देशाच्या चार राज्यात अरुणाचल प्रदेश, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरामध्ये गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाची नोंद केली गेली नाही.

या सगळ्यांमध्ये महाराष्ट्र आणि पंजाब ही अशी राज्य आहेत जेथे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. परंतु आता बाकी राज्यांमध्येही रुग्णांची वाढ होत आहे. तामिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, केरळ, हरियाणा या राज्यात रोज रुग्णांची वाढ होत आहे.