Corona Vaccination | 100 % लसीकरण पूर्ण करणारे भुवनेश्वर ठरले देशातील पहिले शहर

भुवनेश्वर : वृत्तसंस्था –  कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) ओसरत असली तरी भीति कायम आहे. कारण तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा (third wave) दिलेला इशारा आणि केरळसह काही भागात कोरोनाबाधितांची वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता चिंतेचे वातावरण आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण (Corona Vaccination) हा एकमेव पर्याय असल्याने देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. लसीकरणापासून (Corona Vaccination) कोणीही वंचित राहू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात आहे. त्यातून आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मंदिरांचे शहर म्हणून ओळख असलेल्या भुवनेश्वर मधून

ओडिशा राज्याची (Odisha state) राजधानी भुवनेश्वरमध्ये (Capital Bhubaneswar) 100 टक्के लसीकरण झाल्याची माहिती मिळाली आहे. भुवनेश्वर नगरपालिकेचे विभागीय आयुक्त अंशुमन रथ (Divisional Commissioner Anshuman Rath) यांनी यासंदर्भात माहिती दिली असून सुमारे एक लाख प्रवासी नागरिकांनाही लस देण्यात आली आहे.

 

 

भुवनेश्वरमध्ये 100 टक्के लसीकरण

भुवनेश्वरमधील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. शहरात 18 वर्षांवरील नागरिकांची संख्या 9 लाख 7 हजार आहे.
तर भुवनेश्वर शहरात 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांची संख्या 5 लाख 17 हजार असून, 45 वर्षांवरील नागरिकांची संख्या 3 लाख 30 हजार आहे.
31 हजार आरोग्य कर्मचारी असून, 33 हजार फ्रंटलाइन हेल्थ वर्कर (Frontline Health Worker) आहेत.
सर्व नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस नगरपालिकेने सुरू केलेल्या अभियानात देण्यात आला आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात कोरोना लसीकरणाचे निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होता.
मात्र, 2.82 कोटी डोस पिछाडीवर राहिल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारने जुलैच्या अखेरपर्यंत 51.6 कोटी लसीचे डोस पुरविण्याचे लक्ष्य ठेवल्याचे म्हटले होते.
पण ते पूर्ण होऊ शकलेले नाही.
31 जुलैपर्यंत केंद्र सरकारने निश्चित केलेले कोरोना लसीकरणाचे लक्ष्य 94.5 टक्के पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

Web Title : Corona Vaccination | 100 percent corona vaccination done bhubaneswar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

CM Uddhav Thackeray | दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढविण्याबाबत आज आदेश काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Pune Crime | प्रांत अधिकारी असल्याचे सांगून तिघांची 2 लाखाची फसवणूक

Mumbai High Court | उच्च न्यायालयाची ठाकरे सरकारला सूचना; ‘लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या’