Corona Vaccination : ‘आता लस घेण्यासाठी Aadhaar Card बंधनकारक नाही’ – UIDAI

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाची लस घेण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक नसल्याचे UIDAI ने स्पष्ट केले आहे. आधारकार्ड नसेल तर कोणालाही लसीकरणापासून रोखता येणार नाही. तसेच आधारकार्ड अभावी कोणत्याही रुग्णाला औषध, रुग्णालयात दाखल करुन घेणे किंवा उपचार करण्यासंबंधित नकार देता येणार नाही, असेही UIDAI कडून सांगण्यात आले आहे.

आधार कार्डसाठी एक्सेप्शन हँडलिंग मॅकेनिज्म स्थापन केले आहे. 12 अंकाच्या बायोमॅट्रिक आयडीच्या अभावात सुविधा आणि सर्विसची डिलिव्हरी ठरवण्यासाठी याचे पालन केले पाहिजे.एखाद्या व्यक्तीकडे आधारकार्ड नसेल तर त्याला गरजेचे सामान देण्यापासून रोखता येणार नाही. आधार कार्डाशिवायसुद्धा महत्वाचे काम आणि सुविधेचा वापर करता येईल. तसेच आधार कार्ड नसल्यास अथवा कोणत्या कारणास्तव आधार ऑनलाईन वेरिफिकेशन यशस्वी न झाल्यास या संबंधित एजेंसी विभागाला आधार अधिनियम 2016 मधील निर्धारित विशिष्ट मानदंडानुसार सेवा द्यावी लागणार असल्याचे स्पष्टीकरण UIDAI ने केले आहे.