Corona Vaccination | भारतात 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी Covaxin ला मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या लहान मुलांच्या लसीला (Corona Vaccination) अखेर केंद्र सरकारने (Central Government) मंजुरी (approve) दीली आहे. त्यामुळे आता 2 वर्षावरील मुलांना कोरोनाची लस (Corona Vaccination) मिळणार आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी (third wave) केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक पालकांना दिलासा मिळणार आहे. DCGI नं कोव्हॅक्सिनला (Covaxin) दिलेल्या परवानगीनंतर आता देशभरात लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीकडून या वयोगटातील मुलांसाठी लशीला परवानगी मिळाली आहे.
त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणाचा (Corona Vaccination) मार्ग मोकळा झाला आहे.
आता लवकरच ही स्वदेशी लस मुलांना दिली जाणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुासार, पहिल्या टप्प्यात 12 वर्षावरील मुले आणि कोविड कंडिशन असलेल्या मुलांना प्राधान्य दिले जाणार आहे.

अमेरिका (United States), सिंगापूर (Singapore) यांच्यासह जगभरातील 20 देशांनी यापूर्वीच लहान मुलांना कोरोना लस देण्यास सुरुवात केली आहे.
भारतात कोव्हॅक्सिन लसीची 3 टप्प्यात चाचणी घेण्यात आली.
सप्टेंबरपर्यंत ही चाचणी पूर्ण होऊन आशादायक चित्र पुढे आले आहे.
त्यामुळे ऑक्टोबर मध्ये केंद्र सरकारने 2 वर्षावरील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस देण्यास मंजुरी दिली आहे.

 

Web Title : Corona Vaccination | bharat biotech covaxin approved for children between the age of 2 to 18 years know more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

WhatsApp Loan | व्हॉट्सअपवर 10 मिनिटात मिळेल 10 लाख रुपयांचे बिझनेस लोन, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रोसेस

Pune News | पुण्यातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे धनराज राठी यांचे निधन

Mumbai Anti Corruption | सहायक वनसरंक्षक अधिकारी 5.30 लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात; कार्यालयातच सापडलं मोठं ‘घबाड’