‘या’ कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ‘कोरोना’ लसीकरण मोहिम 18 जानेवारी पर्यंत ‘स्थगित’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज संपुर्ण देशात कोरोना लसीकरणास यशस्वी सुरुवात सुरुवात झाली आहे. या लसीकरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. दरम्यान आज पासून सर्व राज्यात कोरोना वॅक्सीन देण्याचे काम चालू करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोना वॅक्सीनला दोन दिवसासाठी स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती CoWIN App मध्ये असलेल्या तांत्रीक अडचणीमुळे देण्यात आली असल्याची माहीती राज्य आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दिंनांक 17 जानेवारी ते 18 जानेवारी असे दोन दिवस महाराष्ट्रात कोरोना लस देण्यात येणार नाही.

देशात कोरोना वॅक्सीन देण्यात सुरुवात झाली असून महाराष्ट्रात पुढिल दोन दिवस कोरोना वॅक्सीनला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. हि स्थगिती दिनांक 17 जानेवारी ते 18 जानेवारी असे दोन दिवसांसाठी असणार आहे. दरम्यान ही स्थगिती एकट्या महाराष्ट्रातच का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.