Corona Vaccination | 18 वर्षांखालील देखील मुलांचं लसीकरण होणार; केंद्र सरकारची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने (Central Government) देशात लसीकरणाला गती दिली. सध्याही लसीला गती मिळू लागली आहे. देशात पहिल्यांदा लसीकरणाचा (Corona vaccination) पुरवठा करताच प्रथम फ्रंटलाईन वर्कर (Front line worker) यांना मान्यता देण्यात आले. त्यांनतर लसीकरणाची उत्पादकता वाढवल्याने नंतर 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याची मंजुरी देण्यात आली. देशात युवकाची संख्या अधिक आहे. भारत हा युवकांचा देश आहे. याच मुद्याचा धागा पकडून केंद्राने परत 18 वर्षावरील सर्वाना मोफत लस देण्यास सुरुवात केली. यावरून आता केंद्राने आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता 18 वर्षाखालील मुलांचं देखील लसीकरणाच्या (Corona vaccination) मोहिमेला लवकरच सुरुवात करणार असल्याचं केंद्र सरकारने (Central Government) सांगितलं आहे.

भारतात सध्या 18 वर्षांखालील (Under 18 years) मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच त्या आता पूर्णत्वाच्या मार्गावर देखील आहेत. त्या लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आणि तज्ज्ञांनी लसीकरणाची मान्यता दिली की लगेचच 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठीचं नियोजन करण्यात येणार आहे. तसेच या लसीकरणाला देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. याबाबत माहिती आज (शक्रवारी) केंद्र सरकारने (Central Government) दिल्ली उच्च न्यायालयाला (Delhi High Court) दिली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या दरम्यान, एका बारा वर्षीय बालकाने आपल्या आईच्या माध्यमातून आणि एका 8 वर्षांच्या मुलाच्या आईने दिल्ली हाय कोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत म्हटलं होतं की, 12 ते 18 वयोगटातल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस (Corona preventive vaccine) द्यावी. असं त्यात नमूद केली होतं. यावरून केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे.

दिल्ली हाय कोर्टानं (Delhi High Court) म्हटलं आहे की, ‘संपूर्ण देश लहान मुलांसाठीच्या लसीकरणाची वाट बघत आहे.
कोर्टानं केंद्राला अजून थोडा वेळ दिला असून आगामी सुनावणी 6 सप्टेंबरला होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
या दरम्यान, लसीच्या चाचणी प्रक्रियेला वेळेची मर्यादा घालून द्यावी या मागणीला कोर्टाने धुडकावून लावलं आहे.
संशोधनाला वेळेची मर्यादा घालून चालणार नाही.
असं म्हणत, प्रत्येकजण कोरोना प्रतिबंधक लस मिळवण्याच्या घाईत आहेत.
परंतु, जर योग्य चाचण्या झाल्या नाहीत तर मोठं संकट निर्माण होईल,
असं देखील दिल्ली हाय कोर्टाने (Delhi High Court) सांगितलं आहे.

Web Titel :- corona vaccination | covid vaccine trial on children near completion policy will be implemented soon after approvals centre to hc

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या