Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात आजपासून शनिवार (दि. 16) कोरोना लसीकरणास (Corona Vaccination ) सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आलेले नाहीत. यामुळे हलकासा ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास उद्भवू शकतो. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मते, असे किरकोळ दुष्परिणाम कोणतीही लस घेतल्यानंतर दिसून येतात. पण त्यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. लस निर्मिती केलेल्या कंपनीने जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये दावा केला आहे की, 10 टक्के लोकांना असा त्रास होण्याची शक्यता असून ही सामान्य गोष्ट आहे

पहिल्या टप्प्यात लसीकरण मोफत आहे. आता लस 18 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना दिली जाणार आहे. यासाठी कोविन (Co-WIN) सॉफ्टवेअर मोबाइलवर पाठवले जाईल. लसीसाठी नोंदणीची गरज नाही. निवडणूक आयोग आणि इतर ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार सरकार स्वतः लाभार्थ्यांची निवड करणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांहून अधिक वयाची आणि आजारी रुग्णांना लस दिली जाईल. लस घेतल्यानंतर अर्धा तास लसीकरण केंद्रातच थांबावे लागेल. सरकारच्या नियमावलीनुसार हे आवश्यक आहे. प्रतिकूल परिणाम दिसून आल्यास 1800 1200124 (24×7) या नंबरवर फोन करता येईल.

गंभीर परिणाम झाल्यास मिळेल भरपाई
कोव्हॅक्सिन तयार करणारी कंपनी भारत बायोटेकने म्हटले आहे की, लस दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचे गंभीर परिणाम दिसून आल्यास भरपाई दिली जाईल. गंभीर दुष्परिणाम दिसून आल्यास सरकारकडून अधिकृत हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातील.