Corona Vaccination | ‘लस घेतल्यास हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची शक्यता 80 टक्क्यांनी कमी’ – नीती आयोगाचे सदस्य डॉ. पॉल

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइऩ – कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरण (Vaccination) मोहीम जोरात सुरू आहे. मात्र लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना होतो असा अनेकांचा समज आहे आणि त्यामुळे लसीच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. असे असताना मात्र नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल (Dr. VK Paul) यांनी लस जरूर घ्या लशीमुळे हजारो लोकांचे आयुष्य वाचत असल्याचे म्हटले आहे. तसेच लस (Vaccine) घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची शक्यता जवळपास 75 ते 80 टक्क्यांनी कमी होते, अशा व्यक्तींना ऑक्सिजनची गरज भासण्याची शक्यता देखील 8 टक्क्यांनी कमी होते. तर लसीकरण झालेल्या व्यक्तीवर आयसीयूमध्ये भरती व्हायची जोखिम देखील फक्त 6 टक्केच राहते, असे एका अभ्यासातून समोर आल्याचे डॉ.पॉल यांनी सांगितले आहे.

डॉ. पॉल म्हणाले की, कोरोना व्हेरियंट येतील अन् ते वाढत राहतील. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या आपल्या फॉर्म्यूल्यात कसलाही बदल होणार नाही. नवा व्हेरियंट यायच्या आधीच आपल्याला त्यापासून वाचण्यासाठी सज्ज रहावे लागेल. तसेच तयारीच्या पातळीवर कसलीही कमतरता राहणार नाही. लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्स 21 जूनपासून लागू होतील. तसेच एम्स आणि WHO च्या लहान मुलांवरील सर्वेक्षणात आढळले आहे की, सीरो पॉझिटीव्हीटी Sero positivity मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांमध्ये देखील आहे.

सीरो पॉझिटीव्हीटी म्हणजे काय?

सीरो पॉझिटीव्हीटीचा Sero positivity तपास करण्यासाठी रक्तातून सीरमला वेगळ केले जात आहे.
त्यानंतर या सीरममधील इतर घटकांची तसेच सूक्ष्म तत्वांची प्रत्येक स्तरावर तपासणी केली जाते.
जर या सीरममध्ये एँटीबॉडीज आढळल्या, ज्या व्हायरसशी लढण्यास सक्षम असतात तर यालाच सीरो इम्यूनिटी अथवा सीरो पॉझिटीव्हीटी Sero positivity म्हणतात.

हे देखील वाचा

 

pune crime news | आयान अन् आलियाचा खून आबिदनं केल्याचा पोलिसांना संशय, कारण देखील आलं समोर; जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

 

Maharashtra Corona | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,798 नवीन रुग्ण, 14,347 रुग्णांना डिस्चार्ज

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Corona Vaccination | dr vk paul says chances of hospitalization are 80 percent less in vaccinated individuals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update