Corona Vaccination | लसीचे दोन डोस घेऊनही माजी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांना कोरोनाची बाधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात लसीकरण मोहिमेने (Corona Vaccination) वेग पकडला असताना आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत (Former Health Minister Dr. Deepak Sawant ) यांनी कोरोना लसीची ( Corona vaccine) दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही दिवसांनी त्यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona report positive) आला आहे. महिनाभरापूर्वीच त्यांच्या शरीरात 268 अँटीबॉडीज होत्या. तरी पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याने बूस्टर डोस घेण्याच्या आवश्यकतेबाबत आयसीएमआरने (ICMR) निकष ठरवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान गेल्या 8 दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुंबई पालिकेकडून पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला असून अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर हॉस्पिटल मध्ये दाखल होत असल्याचे डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.
डॉ. सावंत यांनी 16 जानेवारी आणि 16 फेब्रुवारी रोजी कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे डोस घेतले होते.
त्यांनी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे.
मळम कोरोनाची या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि.21) होणार होता.
मात्र सदर कार्यक्रम रद्द झाल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
या पुस्तकात कोरोना विषयक देश अन् जागतिक स्तरावर लेखाजोखा त्यांनी मांडला आहे.

हे देखील वाचा

 

सर्वसामान्यांच्या खिशाला ‘झळ’ बसणार; जुलैमध्ये ‘या’ वस्तू 10 टक्क्यांनी महागण्याची शक्यता

 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला संजय राऊतांना सबुरीचा ‘सल्ला’

Bulk Drug Park | रायगड जिल्ह्यात उभारणार बल्क ड्रग पार्क’, 75 हजार भूमिपुत्रांना मिळणार रोजगार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Corona Vaccination | former health minister of maharashtra dr deepak sawant tested positive corona positive after taking both doses

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update