Corona Vaccination : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना पहिल्या लसीचा मान

मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत ( Dr. Deepak Sawant) (वय ६५) आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनिता सावंत यांना पहिल्या लसीचा मान मिळणार आहे. डॉ. दीपक सावंत ( Dr. Deepak Sawant) हे विर्लेपार्ले येथील कूपर रुग्णालयातील लसीकरण केंद्रात आले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, या लसीकरण मोहिमेत मी पहिल्या दिवसापासून सहभागी आहे. लसीकरणाचा मान येथे प्रथम मला व माझ्या पत्नीला मिळाल. याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आभारी आहे.

डॉ. दीपक सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून आरोग्य मंत्री म्हणून कार्यरत होते. मात्र, २०१९ मध्ये त्यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. शिवसेनेत डावलले जात असल्याने ते शिवसेनेला शिवबंधन तोडण्याची शक्यता असल्याचे वृत्त नुकतेच आले होते.