देशभरात 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना दिली गेली कोरोना व्हॅक्सीन, आरोग्य मंत्री म्हणाले – : पूर्णपणे प्रभावी आणि सुरक्षित’

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हॅक्सीनेशन अभियान जारी आहे. क्रमाच्या आधारावर फ्रंटलाइन वर्कर्सना व्हॅक्सीन दिली जात आहे. काल 2,33,530 लोकांना व्हॅक्सीन दिली गेली, यासोबतच आतापर्यंत एकुण 10,40,014 लोकांना व्हॅक्सीन दिली गेली आहे. संपूर्ण देशात काल 4,043 व्हॅक्सीनेशन सेशन आयोजित केले गेले, यासोबतच आतापर्यंत एकुण आयोजित व्हॅक्सीनेशन सेशनची संख्या 18,161 झाली आहे. काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत देशात एकुण 9,99,065 लाभार्थ्यांना कोरोना व्हॅक्सीन देण्यात आली होती. देशातील 27 राज्य आणि यूटीमध्ये व्हॅक्सीनेशन करण्यात आले.

कोरोना व्हॅक्सीनेशन अभियानांतर्गत काल आंध्र प्रदेशमध्ये 15 हजार 507 लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली. तर बिहारमध्ये 15,798 लोकांना व्हॅक्सीनेशनचे डोस देण्यात आले आहे. हरियाणात 15,491लोकांना कोरोनाच्या बचावासाठी व्हॅक्सीन देण्यात आली. हिमाचल प्रदेशात 695 आणि जम्मू-काश्मीरात काल 2,408 लोकांनी व्हॅक्सीनेशनमध्ये भाग घेतला. रिपोर्टनुसार व्हॅक्सीनमुळे अजूनपर्यंत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. व्हॅक्सीनेशन अभियानाच्या सुरूवातीपासून आतापर्यंत कुणामध्येही व्हॅक्सीनचा कोणताही गंभीर साइडइफेक्ट दिसून आला नाही, असा दावा करण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी व्हॅक्सीनेशन अंतिम उपाय ठरणार आहे. त्यांनी म्हटले की, दुर्दैवाने काही लोक राजकीय कारणामुळे व्हॅक्सीनेशनबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. अफवांमुळे काही लोकांमध्ये व्हॅक्सीनबाबत भिती निर्माण झाली आहे. हे स्पष्ट आहे की, व्हॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. काही साइड इफेक्टची प्रकरणे तर सर्वच व्हॅक्सीननंतर समोर येत असतात.