Corona vaccination in India | भारताचा ऐतिहासिक विक्रम ! कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत भारतानं आज एक इतिहास रचला आहे. भारतानं कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये (Vaccination) शंभर कोटींचा (One hundred crores) टप्पा पार केला आहे. यामुळे भारताने एक ऐतिहासिक यश मिळवल्याचे स्पष्ट होते आहे. आतापर्यंत 100 कोटी भारतीय नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

जानेवारीच्या 16 तारखेपासून भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला (Corona preventive vaccine) सुरूवात झाली. यानंतर टप्याटप्याने लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. त्याचबरोबर कोरोनाची परिस्थिती पाहता भारताने लसीकरणाला गती दिली आहे. तर, देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी (Corona vaccination in India) कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन (Covishield and covacin) या लसींचा वापर अधिक केला जात आहे. तसेच काही वेळा दिवसाला एक कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. दरम्यान, आज 21 ऑक्टोबर रोजी कोरोना लसीकरणामध्ये (Vaccination) 100 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा भारताने पार केला आहे.

दरम्यान, 16 जानेवारी 2021 पासून भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यावेळी कोविड योद्धे असलेल्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली होती. तसेच, 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील व्यक्ती आणि 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे, कोरोनाच्या लसीबाबतच्या अफवा, शंका आणि लसींचा तुटवडा यामुळे या लसीकरण मोहिमेत अनेक अडथळे आले. पंरतु, या अडथळ्यांवर मात करत भारतात लसीकरण मोहीम गतीने सुरू राहिली.

हे देखील वाचा

Parambir Singh | ‘बेपत्ता’ परमबीर सिंह आणखी ‘गोत्यात’ ! आता अटकेची टांगती तलवार

BJP MP Raksha Khadse | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंविरूध्द निवडणूक लढविणार्‍या भाजपच्या खा. रक्षा खडसेंना मोठा धक्का

Pune Cyber Crime | गंडविण्यासाठी सायबर चोरट्यांची अफलातून ‘आयडिया’; चित्रकाराला घातला 80 हजारांचा गंडा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Corona vaccination in India | corona vaccination indias historic achievement corona vaccination 100 crore cross

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update