Corona Vaccination : लस टोचून घेतल्यानंतर भारतात ब्लड क्लॉटिंगच्या घटना, जाणून घ्या लक्षणांसंबंधीची अ‍ॅडवायजरी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग अद्यापही कायम आहे. लसीकरणही वेगाने सुरु आहे. मात्र, आता ज्या लोकांचे लसीकरण पूर्ण झाले त्यांच्यापैकी काही लोकांमध्ये रक्तासंबंधी काही बदल दिसत आहेत. त्यांचे रक्त घट्ट होणे आणि पातळ होण्यासारखी समस्या उद्भवत आहे. अशाप्रकारच्या अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नॅशनल एडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन समितीद्वारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला अहवाल दिला आहे. त्यामध्ये दावा केला की, यावर्षी मार्च महिन्यात एस्ट्रेजेनेका-ऑक्सफोर्ड लस जी लस कोविशिल्ड नावाने ओळखली जाते. त्यानुसार, अनेक देशांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. कारण या प्रकरणात लस टोचल्यानंतर रक्तात थक्का जमा होतो. त्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर भारतात यावर विस्तृत संशोधन केले गेले होते.

700 गंभीर प्रकरणे

3 एप्रिल, 2021 पर्यंत देशात 7.5 कोटी लसींची मात्रा देण्यात आली होती. ज्यामध्ये पहिला डोस 6.5 कोटी होता तर सुमारे एक कोटी दुसरी लस होती. यादरम्यान एकूण 23 हजार प्रकरणे नोंदवण्यात आले. जे देशातील 684 जिल्ह्यांत होते. मात्र, 23 हजारांत फक्त 700 प्रकरणे होते. पण ते अत्यंत गंभीर होते.

या लक्षणांवर विशेष लक्ष देणे गरजेचे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जर हेल्थवर्कर्स आणि लस घेणाऱ्या लोकांना जर लस घेतल्यानंतर 20 दिवसांत कोणतीही लक्षणे दिसली नाही तर ते रुग्णालयात सूचना देऊ शकतात. यामध्ये छातीत दुखणे, श्वास घेताना त्रास, हात सूजणे किंवा जास्त वेदना, लस घेतलेल्या ठिकाणी लाल निशाण उठणे, पोटात दुखणे, सातत्याने उल्टी होणे, सातत्याने डोकेदुखी होणे. शरीरात अंगदुखी होणे, डोळे दुखणे, डबल व्हिजन यांसारखी लक्षणे जाणवू लागतात.