Corona vaccination in Pune | एक डोस झाला असला तरी प्रवासापूर्वी RTPCR चाचणी बंधनकारक, पुणे महापालिका प्रशासनाने केलं स्पष्ट

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पुणे शहरामध्ये कोरोना लसीकरण (Corona Vaccination in Pune) मोहिम राबवली जात आहे. कोरोनाचा पहिला डोस (Corona Vaccination in Pune) घेतल्यानंतर प्रवासापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर पुणे महापालिका (PMC) प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी आवश्यक नाही. परंतु पहिला डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असल्याचे पुणे पालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

लोहगाव विमानतळ (Lohegaon Airport) आणि पुणे रेल्वे स्टेशनवर (Pune Railway Station) उतरणाऱ्या प्रवाशांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असतील.
तर त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही.
मात्र, एकच डोस झाला असेल तर प्रवासापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असल्याचे पुणे महापालिका (pune corporation) प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रवासापूर्वी RTPCR चाचणी बंधनकारक

पुण्यात येणाऱ्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य सरकारने (State Government) स्पष्ट केले आहे.
तसेच ज्या प्रवाशांचे दोन डोस झाले नसतील अशा प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे.
अन्यथा त्यांची विमानतळ अथवा रेल्वे स्थानकावर आरटीपीसीआर चाचणी करण्याचे बंधन राज्य सरकारने घातले असल्याची माहिती, महापालिका (pune corporation) सहआरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे (Dr. Sanjeev Wavre) यांनी दिली.

पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची चाचणी

सध्या पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची लोहगाव विमानतळावर (lohegaon airport) तेथील प्रशासनाकडून तर रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) महापालिका प्रशासनाकडून चाचणी करण्यात येत आहे.
रेल्वे स्थानकावर त्यासाठी महापालिकेची (pune corporation) तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. ज्या प्रवाशांनी दोन डोस घेतले आहेत .
त्यांनी प्रवासादरम्यान प्रमाणपत्र जवळ बाळगावे.
अन्यथा त्यांना चाचणी करावी लागेल.
असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. ज्यांनी एक डोस घेतला आहे.
त्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

Web Title : Corona Vaccination in Pune | binding of test during travel if a single dose of vaccine is given

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SSC Constable Job | 10 वी उत्तीर्ण तरुणांना सुवर्णसंधी ! जीडी कॉन्स्टेबलच्या 25 हजार पदासाठी बंपर भरती, 69 हजार पर्यंत पगार, जाणून घ्या

Burglary in Pune | पुण्यातील वारजे माळवाडी आणि वाघोली परिसरात घरफोड्या, 4 लाखाचा ऐवज लंपास

Pune Crime | चोरी करताना हटकल्याने चोरटयांकडून मेट्रोच्या कामगारांना मारहाण, हॅरिस ब्रिजवळील घटना