Corona Vaccination in Pune : महापालिकेच्या 5 केंद्रांवर 24 तास कोरोना लसीकरण सुरू राहणार – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाबधितांची वाढती संख्या पाहता पुणे शहरात एक चिंतेचे वातावरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम जोरदार सुरू आहे. शहरातील नागरिकांना लसीकरणामध्ये काही अडचणी येत आहे मात्र आता पुणे महापालिकेच्या शहरातील ५ केंद्रावर २४ तास लसीकरण सुरू राहणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

दरम्यान, पुणे शहरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासन आणि आरोग्य विभाग यंत्रणा युद्ध पातळीवर कार्यरत आहे. परंतु अशावेळी नागरिकांकडूनच कोरोना नियमाचे पालन होत नसल्याचे समोर येत आहे. त्यामध्ये विनामास्क फिरणाऱ्यां नागरिकांकडून आतापर्यंत तब्बल १३ कोटींचा दंड वसूल करून करण्यात आला आहे. तरीदेखील परिस्थितीचे गांभीर्य पुणेकर नागरीकारांना नाही अशी स्थिती आहे. तसेच शहरातील पुणे महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रांवर २४ तास लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरात संचार निर्बंध लागू असल्याने रात्री ११ वाजल्यानंतर फक्त आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर लसीकरण करुन घेऊ शकणार आहेत.

महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रे –

१. राजीव गांधी हॉस्पिटल (येरवडा)

२. सुतार दवाखाना, (कोथरूड)

३. लायगुडे हॉस्पिटल, (वारजे)

४. मगर हॉस्पिटल (हडपसर)

५. कमला नेहरू हॉस्पिटल