Corona Vaccination in Pune Court : जिल्हा न्यायालयात होणार वकिलांची लसीकरण

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे बार असोसिएशनतर्फे (पीबीए) ४५ वर्षावरील १०० वकिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी (दि. २९-३०) न्यायालयातील बार रूममध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यात बाधीत झालेल्या वकिलांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे वकिलाच्या लसीकरणासाठी पीबीएने पुढाकार घेतला आहे. लसीकरणाबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली असून त्यांनी १०० वकिलांना लसीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत ४५ वर्षावरील वकिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. न्यायालयातील सेंट्रल बार रूम मध्ये याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतीश मुळीक यांनी दिली.

१०० वकिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यातील ७० जणांची नोंदणी झाली असून आणखी ३० जणांची नोंदणी करण्यात येणार आहे. उद्यापर्यत उर्वरित ३० नावे नोंदवली जातील.

ॲड. सतीश मुळीक (अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन)