Corona Vaccination In Pune | वर्षभरात पुणे जिल्ह्यातील दीड कोटी नागरीकांचं लसीकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Corona Vaccination In Pune | दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा (Coronavirus) वेग वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता लसीकरणाचा वेग देखील वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार, आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाकडून लसींचे दोन्ही डोस वेळेत घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात (Pune News) लसीकरणाची (Corona Vaccination In Pune) वर्षपूर्ती झालेली असताना एक कोटी 60 लाख 90 हजार 547 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. म्हणजेच वर्षभरात पुणे जिल्ह्यात दीड कोटी नागरीकांचं लसीकरण करण्यात आलंय.

 

देशात 16 जानेवारी 2021 रोजी पासून लसीकरणाला (Vaccination) सुरूवात झाली. तेव्हापासून लसीचा वेग वाढवला गेला. पुणे जिल्ह्यात दीड कोटींचा लसीकरणांचा टप्पा पार झाला आहे. अधिकाधिक पुणेकरांनी लस घेतल्याचे दिसते आहे. 18 वर्षे वयोगटावरील 80 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेय. नववर्षात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले असून, आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना तिसरा डोस (Booster Dose) देण्यास सुरुवात झालीय. (Corona Vaccination In Pune)

जिल्ह्यात 15 जानेवारीपर्यंत एक लाख 57 हजार 676 आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला डोस,
तसेच दुसरा डोस एक लाख 43 हजार 124 जणांनी घेतला आहे.
16 हजार 157 आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घेतला आहे.
दोन लाख 52 हजार 545 अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनी, त्याचबरोबर दोन लाख 35 हजार 533 जणांनी, आणि दहा हजार 978 जणांना लसीचा तिसरा डोस देण्यात आला आहे.

 

पुणेकरांचं लसीकरण –
पहिला डोस – 15 ते 18 वयोगटातील – 2 लाख 34 हजार 215, पहिला डोस – 18 ते 44 वर्षे वयोगटातील – 56 लाख 84 हजार 472

पहिला डोस – 45 ते 59 वर्षे वयोगटातील – 17 लाख 16 हजार 561

दुसरा डोस – 18 ते 44 वर्षे वयोगटातील – 41 लाख 14 हजार 203
दुसरा डोस – 45 ते 59 वर्षे वयोगटातील – 14 लाख 852
ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस – 11 लाख 61 हजार 97, व 9 लाख 48 हजार 454 दुसरा डोस.
तर 14 हजार 670 जणांनी तिसरा डोस घेतला.

 

Web Title : Corona Vaccination In Pune | vaccinations of one and half crore pune cirizens throughout year

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा