Corona Vaccination | लसीकरणात भारताने अमेरिकेला टाकले मागे; 32 कोटी 36 लाख नागरिकांचे लसीकरण
नवी दिल्ली : Corona Vaccination |कोरोना विरोधातील लढ्यात महत्वाचे ठरणार्या लसीकरणात भारताने आता वेग घेतला असून रविवारी सर्वाधिक लसीकरणाबरोबरच (Vaccination) एकूण लसीकरणात भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे.
भारतात आतापर्यंत ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ जणांना रविवारी लस देण्यात आली आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३२ कोटी ३२ लाख २७ हजार ३२८ जणांना लस देण्यात आली आहे.
India administers 32,36,63,297 doses of #COVID vaccines and overtakes the USA: Ministry of Health pic.twitter.com/3Bz20h6eUm
— ANI (@ANI) June 28, 2021
जगात सर्वात प्रथम इंग्लडने ८ डिसेंबर रोजी लसीकरणास (Vaccination) सुरुवात केली होती. त्यानंतर अमेरिकेने १४ डिसेंबर रोजी लसीकरणास (Vaccination) प्रारंभ केला. भारताने १६ जानेवारी रोजी लसीकरणास (Vaccination) प्रारंभ केला. लसीच्या तुटवडा भासत असतानाही भारताने ही मजल मारली आहे.
जगभरातील प्रमुख देश व त्यांचे लसीकरण (Major countries around the world and their vaccinations)
देश लसीकरणाची सुरुवात २८ जूनची स्थिती
इंग्लड ८ डिसेंबर ७६७७४९९०
अमेरिका १४ डिसेंबर ३२३३२७३२८
इटली २७ डिसेंबर ४९६५०७२१
जर्मनी २७ डिसेंबर ७१४३७५१४
फ्रॉन्स २७ डिसेंबर ५२४५७२८८
भारत १६ जानेवारी ३२३६६३२९७
Uday Samant । 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार