देशात 6 लाख लोकांना दिलं ‘कोरोना’ व्हॅक्सीन, सुमारे 1000 मध्ये दिसला साइड इफेक्ट

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी माहिती दिली की, भारतात आतापर्यंत जेवढ्या लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली, त्यांच्यापैकी केवळ 0.18 टक्के लोकांमध्ये म्हणजे सुमारे एक हजार लोकांमध्ये दुष्परिणाम दिसून आला. तर 0.002 टक्के लोक असे आहेत, ज्यांना व्हॅक्सीन दिल्यानंतर पुन्हा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता भासली. भारतात 16 जानेवारीपासून व्हॅक्सीनेशनचे (corona vaccination) काम सुरू झाले आणि आता वेगाने पुढे जात आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी पुढे येऊन कोरोना लस घेतली पाहिजे, व्हॅकसीनबाबत जेवढ्या चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात असतील त्यावर लक्ष दिले पाहिजे. नीती आयोगाचे सदस्य वी. के. पॉल यांनी विश्वास व्यक्त केला की, देशात ज्या दोन व्हॅक्सीनला मंजूरी मिळाली आहे, त्या एकदम ठिक आहेत.

मागील काही दिवसात कोरोनाची लस दिल्यानंतर दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते, मात्र नंतर सरकारने आपल्या वक्तव्यात म्हटले की, त्यांच्या मृत्यूचा लसीशी कोणताही संबंध नाही, हे पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झाले आहे.

भारतात मागील चार दिवसात सुमारे 6 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. एका दिवसात व्हॅक्सीन देण्याच्या बाबतीत भारत आता अमेरिकेपेक्षा पुढे आहे, लवकरच देशाचा हा वेग आणखी वाढेल.

केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे की, कोणत्या सेशनमध्ये कोणती व्हॅक्सीन दिली जाणार आहे, हे पूर्णपणे राज्य सरकारवर अवलंबून आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश, राजस्थान सारख्या राज्य अशी आहेत जिथे लक्ष्य वेगाने पूर्ण केले जात आहे. लक्षद्वीप, सिक्किम, ओडिसा, तेलंगना, उत्तर प्रदेश, राजस्थान सध्या अशी राज्य आहेत जिथे 71 टक्केपेक्षा जास्त लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे.