Corona Vaccination : ‘कोरोना’मुक्त झालेल्यांसाठी लसीचा केवळ एक डोस पुरे असल्याचा निष्कर्ष?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना(corona)मुक्त झालेल्या व्यक्तींनी कोरोना(corona) प्रतिबंधक लसीचा केवळ एक डोस पुरे असल्याचा निष्कर्ष लॅन्सेटच्या अंतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील इबायोमेडिसिन संशोधन अहवालातील बाबींनुसार मांडला आहे. जगभरात विविध पातळ्यांवर याविषयी संशोधन सुरू आहे. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांकडून याबाबत सकारात्मकता दर्शविण्यात येत आहे.

हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा होईल इंजिनियरिंगचे शिक्षण, एआयसीटीईने (AICTE) दिली परवानगी

कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींमध्ये पुरेशा प्रमाणात अँटिबॉडीज तयार झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार करण्यात आला आहे. एका वैद्यकीय नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित आहे. त्यामुळे या रुग्णांच्या शरीरात तीन ते सहा महिने अँटिबॉडीज राहतात. परिणामी, लसीचा केवळ एक डोस हा कोरोनामुक्त व्यक्तींसाठी बूस्टर डोस असतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणात आढळले आहे. दरम्यान, राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, कोरोनामुक्त झाल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती(Immunity) निर्माण झालेली असते, तीन किंवा सहा महिने ही रोगप्रतिकारशक्ती(Immunity) टिकून राहते. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी लसीचा केवळ एक डोस हा बूस्टर ठरतो. दरम्यान, अद्याप या संशोधनावर केंद्राकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, विविध संशोधनांत आढळून आलेल्या बाबी निष्कर्षांनुसार सकारात्मक आहे; परंतु त्याबद्दल अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. लसीकरण प्रक्रियेचा वेग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठीही हे संशोधन उपयुक्त ठरू शकते.

शिवसेनेचा मोदी सरकारवर टीकेचे बाण; म्हणाले – Facebook, ट्विटर, WhatsApp वर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार?’

केंद्र सरकारने(Central Government) कोरोनातून बरे झालेल्यांच्या लसीकरण करण्यासंदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी नागरिकांना लस घेता येणार आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सिन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविडने देशातील आणि जगातील कोरोनास्थिती याबाबत अभ्यास केला. या अभ्यासावर आधारित अहवाल स्वीकारल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही नियमावली जाहीर केली आहे.

Pune : पत्नीने दिली शिवी, रागात पतीने गळा दाबून केला खून

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत

दिवसाला 5 बदाम वाढवतील तुमची ‘इम्यून’ पावर, पाण्यात भिजवून खावे, जाणून घ्या

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या