Corona Vaccination : पुण्यात लसीकरण ‘सुपरफास्ट’ ! आतापर्यंत 11 लाख जणांना दिला ‘डोस’, ‘रिकव्हरी रेट’ देशात ‘अव्वल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या  दुस-या लाटेत सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहर (pune city) आघाडीवर होते. मात्र आता शहराचा कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा देशात सर्वाधिक ठरला आहे. कोरोना काळात केलेल्या उपाययोजना, आणि त्यानंतर लसीकरण तसेच इतर प्रयत्नांमधून शहराला हे यश मिळवता आले आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्याचा कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट हा शुक्रवारी (दि. 4) 97.15 टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यातच नव्हे तर देशात हा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढवलेल्या पुणे शहराने (pune city) कोरोनावर मात करण्याच्या शर्यतीतही आघाडी घेतली आहे.

Subodh Kumar Jaiswal : ‘CBI अधिकाऱ्यांना दाढी वाढवता येणार नाही, स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल चालणार नाही’

मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्याच्या आधीपासूनच जवळपास महिनाभर तशी चर्चा आणि संकेतही मिळत होते. पण ज्या वेगाने या काळात रुग्णांची संख्या वाढत होती. तो चिंतेचा विषय होता. राज्यात कोरोनाचा फैलाव होत होता. पुण्यात तर कोरोना रुग्णसंख्या रोज नवनवे उच्चांक गाठत होती. आरोग्य व्यवस्था जणू कोलमडून पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण प्रशासनाने उपाययोजनांचा वेग अधिक वाढवला. त्यामुळे त्याच वेगाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले आहे.

पुण्याचा कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा 97.15 टक्क्यांवर पोहचला होता.
परिणामी रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग हा 899 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे.
पुण्याने केलेल्या या उपाययोजनांमध्ये लसीकरणाचा मोठा वाटा होता.
आतापर्यंत पुण्यात 11 लाख 22 हजार 811 जणांना लसीचे डोस दिले आहेत.
शहरातील रुग्णसंख्या घटल्याने कंटेन्मेंट झोनमध्येही मोठी घट झाली आहे. शहरात फक्त 28 कंटेन्मेंट झोन असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Fact Check : सरकार 3 महिन्यांसाठी देत आहे मोफत इंटरनेट ? जाणून घ्या ‘सत्य’

 

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत

भाडेकरूंसाठी खुशखबर ! 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये घरमालक

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card; जाणून घ्या ऑनलाइन अप्लाय करण्याची संपूर्ण प्रोसेस