Corona Vaccination | स्विझर्लंडसह EU च्या 7 देशांनी कोविशील्ड लस घेणार्‍यांना दिली प्रवासाची परवानगी

नवी दिल्ली (New Delhi) : Corona Vaccination |कोविशील्डवरून यूरोपीय संघात मोठा गोंधळ सुरू आहे. स्विझर्लंड आणि यूरोपीय संघाच्या सात देशांनी गुरुवार कोविशील्ड (Corona Vaccination) घेतलेल्या लोकांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे एक दिवस अगोदरच भारताने औपचारिक प्रकारे ईयूच्या सदस्यांना कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनचा पासपोर्ट लिस्टमध्ये समावेश करण्याचे आवाहन केले होते.

याशिवाय बुधवारी केंद्राने म्हटले होते की, कोविशील्ड (covishield) आणि कोव्हॅक्सीनचा (Covaxin) समावेश न केल्याने ईयूच्या नागरिकांसाठी अनिवार्य क्वारंटाइन नियम करावे लागतील. पुणेयेथील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार झालेल्या या व्हॅक्सीनचे डोस घेणारे स्विझर्लंडमध्ये ग्रीन पास मिळवू शकतात.

गुरुवारी ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आयलँड, आयर्लंड आणि स्पेनने कोविशील्ड व्हॅक्सीन (covishield vaccine) स्वीकारली आहे. भारताने सदस्य देशांना कोविन पोर्टलद्वारे (Covin Portal) प्राप्त व्हॅक्सीन सर्टिफिकेटला मंजूरी देण्याचे आवाहन केले होते. या दरम्यान भारतीय अधिकार्‍यांनी म्हटले होते की, सर्टिफिकेटची सत्यता कोविनद्वारे पडताळता येऊ शकते.

सध्या यूरोपियन मेडिसिन्स एजन्सीने केवळ चार व्हॅक्सीनला परवानगी दिली आहे. यामध्ये फायजर/
बायोएनटेकची कॉर्मिनाटी, मॉडर्ना, एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डची व्हॅक्सजर्विया आणि जॉन्सन अँड
जॉन्सनच्या जेनसेनचा समावेश आहे. केवळ याच चार व्हॅक्सीन घेतलेल्या लोकांनाच व्हॅक्सीन
पासपोर्ट दिला जात होता आणि महामारीच्या दरम्यान यूरोपीय संघात प्रवास करण्याची परवानगी दिली होती.

सोमवारी सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ अदर पूनावाला (Aadar Poonawala, CEO of Serum Institute)  यांनी ट्विट केले होते की, मला जाणवले आहे की, अनेक भारतीय ज्यांनी कोविशील्ड घेतली आहे, ते ईयूच्या प्रवासात अडचणींचा सामना करत आहेत. मी सर्वांना विश्वास देतो की, मी ही बाब वरपर्यंत मांडली आहे आणि आशा करतो की, प्रकरण वरिष्ठ पातळीवर लवकर सोडवले जाईल.

सध्याच्या नियमानुसार, कोविशील्ड (covishield) किंवा कोव्हॅक्सीन (Covaxin) घेतलेले
भारतीय आणि इतर देशांचे लोक ईयूमध्ये विना प्रतिबंध प्रवास करू शकत नाहीत. याचा अर्थ हा
आहे की, त्यांना प्रत्येक देशाना बनवलेल्या नियमांसह क्वारंटाइनमधून सुद्धा जावे लागेल.

हे देखील वाचा

Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

Nilesh Rane | ‘तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही’

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Corona Vaccination | switzerland and seven eu countries accepted covishield gives nod to travellers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update