लसींच्या तुटवड्यामुळे ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय, उद्यापासून अंमलबजावणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात उद्यापासून (दि.1 मे) 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. दरम्यान राज्यातही 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. मात्र सध्या राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करतानाच अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे केंद्र सरकारकडून मिळणारा लसींचा साठा केवळ शासकीय रुग्णालय आणि लसीकरण केंद्रांवरच वापरता येणार आहे. या लसींचा साठा खासगी रुग्णालयांना करण्यात येणार नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांना थेट लस उत्पादकांकडून लसीचा साठा खरेदी करावा लागणार आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

देशात उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्राने घेतला असला तरी महाराष्ट्राह अनेक राज्यांकडे लसींचा पुरेसा साठा नाही. त्यामुळे 1 मेपासून नमूद वयोगटातील नागरिकाचे लसीकरण होणार आहे. राज्य सरकारकडे कोरोना लसींचा पुरेसा साठा असावा यासाठी आता पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारकडून येणारा कोरोना लसींचा साठा केवळ शासकीय रुग्णालय आणि लसीकरण केंद्रांमध्येच वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान यापूर्वी आधी केंद्र सरकार लस उत्पादकांकडून 100 टक्के साठा खरेदी करत असत. त्यानंतर सर्व राज्यांमध्ये लसींचे वाटप होत असे. आता मात्र केंद्र सरकार लस उत्पादकांकडून 50 टक्के साठा खरेदी करत आहे. उर्वरित 50 टक्के साठा उत्पादकांना राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना विकता येणार आहे.