Corona Vaccination | देशात लसीकरणाचा आकडा 55 कोटीच्या पुढे, ऑगस्टच्या 15 दिवसात देण्यात आले व्हॅक्सीनचे 7.5 कोटी डोस

नवी दिल्ली : Corona Vaccination | जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वाढलेला कोरोना लसीकरणाचा वेग ऑगस्टमध्ये सुद्धा जारी होता. सोमवारी 81 लाखापेक्षा जास्त डोस दिले गेले, तर ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात संपूर्ण देशात व्हॅक्सीनचे 7.54 कोटी डोस देण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union health ministry) सोमवारी दावा केला की, देशात कोविड-19 विरोधी व्हॅक्सीनचे आतापर्यंत 55 कोटीपेक्षा जास्त डोस (Corona Vaccination) देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी ट्विट करत म्हटले की, विक्रमी प्रगतीसह देशात कोविड-19 विरोधी व्हॅक्सीनचे 55 कोटी डोस दिले गेले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने महिन्या उर्वरित दिवसात 10 कोटीपेक्षा जास्त डोस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सोबतच व्हॅक्सीनच्या गुणवत्तेच्या चाचणीसाठी मंत्रालयाने हैद्राबादच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ अ‍ॅनिमल बायोटेक्नॉलॉजीला नॅशनल ड्रग लॅबोरॅटरीचा दर्जा दिला आहे.

IND vs ENG | Jasprit Bumrah-Mohammed Shami ने इंग्लंडला असा दिली धक्का, वेगवान फलंदाजीने मॅचला दिली कलाटणी

आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले की, व्हॅक्सीनच्या वाढत्या पुरवठ्यासह देशात लसीकरणाचा वेगसुद्धा वाढला आहे. जुलै महिन्यात एकुण 13.45 कोटी डोस देण्यात आले होते, आता ऑगस्टमध्ये 18 कोटी डोसपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे.

यापैकी जवळपास 15 कोटी डोस एकटी सीरम इन्स्टीट्यूट उपलब्ध करत आहे, तर भारत बायोटेक तीन कोटी डोस देत आहे. स्पुतनिक-व्हीचे सुद्धा जवळपास एक कोटी डोस मिळण्याची अपेक्षा आहे, परंतु त्यांच्या पुरवठ्याची अनिश्चितता पाहता लसीकरण अभियानाच्या लक्ष्यात त्यास सहभागी केलेले नाही.

आरोग्य मंत्रालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलैच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या
आठवड्यात प्रतिदिन एक कोटी डोसपेक्षा जास्त द्यायचे होते. परंतु भारत बायोटेकच्या बेंगळुरु
युनिटच्या गुणवत्तेच्या कमतरतेमुळे उत्पादन सुरू न होऊ शकल्याने हे लक्ष्य साध्य करता आले नाही.

वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनच्या उत्पादनाचे मोठे युनिट हेच आहे.
या युनिटमधून आता ऑगस्टच्या अखेरपर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पुरवठा सुरू
होण्याची अपेक्षा आहे.

हे देखील वाचा

ATM Fraud | ATM फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी ठवा लक्षात, होणार नाही फसवणूक, जाणून घ्या

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना इशारा, म्हणाले – ‘… तर तुमची पोलखोल करणार’

Fuel Price | अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले, अखेर का कमी केल्या जात नाहीत इंधनाच्या किमती, हे आहे कारण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Corona vaccination | union govt says cumulative covid vaccine doses administered in india cross 55 crore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update