UP : मकर संक्रांतीला लसीकरणाला सुरुवात ? CM योगी आदित्यनाथ यांचे संकेत

पोलिसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशात या महिन्यात मकर संक्रांतीच्या दिवशी कोरोना लस (corona vaccine) देण्याची मोहीम सुरू होऊ शकते. तसंच उत्तर प्रदेशातील नागरिकांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. असे संकेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी दिले आहेत. गोरखपुर जिल्ह्यात एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.

यावेळी बोलताना योगी म्हणाले, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सध्या कोरोनामुळे खूप वाईट परिस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारताने कोरोनाविरोधात जबरदस्त लढा दिला आहे आणि यात यश प्राप्त झालं आहे. उत्तर प्रदेशातील एकूण ६ जिल्ह्यांमध्ये सध्या लशीकरणाचे ‘ड्राय रन’ सुरू आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशातील जनतेला कोरोनाची लस देण्याची मोहीम सुरू केली जाऊ शकते, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. कोरोना लसीकरणासाठीच्या जिल्हास्तरीय तयारीपासून सर्व पातळीवरी आढावा घेत अआहे. याशिवाय, लशीच्या साठवणुकीसाठी ‘कोल्डचेन’ची यंत्रणा तयार केली जात असल्याचंही योगी यावेळी म्हणाले.