Corona Vaccination | मोदी सरकारनं कोविशील्ड लशीबाबतचा ‘तो’ निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेवून घेतला?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) कमी झाली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग वाढवण्याची आवश्यकता आहे. लसींचा तुटवडा जाणवत असताना सरकारने (Government) महिन्याभरापूर्वी कोविशील्ड लसीच्या (Covishield vaccine) दोन डोसमधील (two doses) अंतर (distance) वाढवण्याचा निर्णय (decision) घेतला. मात्र हा निर्णय तज्ज्ञांना (Expert) अंधारात ठेऊन घेण्यात आला होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, लसींची टंचाई जाणवत असल्यानं लसीकरणाला (Corona Vaccination) गती देण्यात अडथळे येत आहेत.

केंद्राला अंतर वाढवण्यास सांगतले नव्हते (The center was not asked to increase the time-span)

कोविशील्डच्या (Covishield vaccine) दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांवरून 12 ते 16 आठवडे करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Ministry of Health) 13 मे रोजी घेतला. त्यावेळी देशात कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या वाढत होती आणि लसींचा साठा कमी होता. तज्ज्ञांच्या सल्लानं कोविशील्डच्या दोन डोसमधील कालावधी वाढवत असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, अशा प्रकारचा कोणताही सल्ला (Advice) आपण केंद्राला (Central Government) दिला नसल्याचं पॅनलमधील तीन तज्ज्ञांनी (three experts) एका वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

केंद्राने यावरुन घेतला अंतर वाढवण्याचा निर्णय

नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनच्या (NTAGI) शिफारशीनुसार कोविशील्डच्या (Covishield vaccine) दोन डोसमधील अंतर (distance between the two doses) वाढवण्याचा निर्णय घेत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. ब्रिटनमध्ये (Britain) करण्यात आलेलं सर्वेक्षण (Survey) आणि त्यातून उपलब्ध झालेली आकडेवारी यांच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र अशा प्रकारची शिफारस (Recommended) करण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचं एनटीएजीआयच्या (NTAGI) पॅनलमधील 14 पैकी 3 सदस्यांनी सांगितलं आहे.

पण सरकारने 12 ते 16 आठवड्यांचा निर्णय घेतला (But the government decided 12 to 16 weeks)

‘आम्ही 8 ते 12 आठवड्यांचं अंतर ठेवण्याची शिफारस केली होती. पण ते 12 ते 16 आठवड्यांचा निर्णय सरकारनं (government) घेतला. हा निर्णय योग्य असू शकतो किंवा मग तो अयोग्यदेखील असू शकतो. आमच्याकडे त्याबद्दलचा तपशील उपलब्ध नाही (Details not available). जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) दोन डोसमधील अंतर 8 ते 12 आठवडे करण्याचा सल्ला दिला. एनटीएजीआयनं (NTAGI) या सल्ल्याची शिफारस केली. मात्र दोन लसींमधला कालावधी 12 आठवड्यांहून अधिक असावा असं एनटीएजीआयनं सुचवलं नव्हतं,’ अशी माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमिओलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते (M. D. Gupte) यांनी दिली.

 

सरकारकडून स्पष्टीकरण (Explanation from the government)

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पब्लिक हेल्थ इंग्लंड (Public Health England) या ब्रिटनच्या आरोग्य विभागाच्या एजन्सीनं (UK Department of Health Agency) काही आकडेवारी प्रसिद्ध केली.
लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 आठवडे ठेवल्यास तिची परिणामकारकता 65 ते 88 टक्के असते, असं त्यांच्या संशोधनातून समोर आलं होतं.
लसींच्या डोसमधील अंतर (Distance between vaccine doses) 12 आठवड्यांचे ठेवून ब्रिटन कोरोना (Britain Corona) संकटातून बाहेर आला.
प्रत्येकाला 12 आठवड्यांनंतर लसीचा दुसरा डोस मिळतोच असं नाही.
त्यामुळे दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्याचा निर्णय घेतला गेला, असं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे.

Wab Title :- corona vaccination we didnt back doubling vaccine dosing gap says scientists, government decided that

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये