Corona Vaccination : पुन्हा बदलणार नियम ! कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर लस टोचून घेण्यासाठी करावी लागू शकते 9 महिन्यांची ‘प्रतिक्षा’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. कोरोना लसीकरणाबाबत गाईडलाईन्सही जारी करण्यात आल्या आहेत. कोरोनातून बरे झाल्याच्या 6 महिन्यानंतर कोरोना लस द्यावी, असे म्हटले असताना आता नवी गाईडलाईन्स जारी झाली आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. त्यानंतर लसीकरणाच्या नियमावलीत अनेकदा बदल करण्यात आले आहेत. आताही कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना 9 महिन्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस देता येऊ शकते. नॅशनल एक्सपर्ट ग्रुफ ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन (NEGVAC) कडून लवकरच निर्णय दिला जाऊ शकतो. यापूर्वी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाला 6 महिन्यानंतर लस दिली जावी, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये आता बदल केला जाईल, अशी शक्यता आहे.

तज्ज्ञांनी सांगितले, की भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान रिन्फेक्शनचा रेट 4.5 टक्के होता. त्यादरम्यान 102 दिवसांचे अंतर दिसून आले होते. तसेच काही देशांनी केलेल्या अभ्यासातून हे समोर आले, की कोरोनाने बाधित झाल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत इम्युनिटी राहू शकते. त्यामुळे वेळ गरजेचा आहे.

दरम्यान, लसीकरणाबाबतच्या नियमांमध्ये काही दिवसांपूर्वीच बदल करण्यात आले होते. ज्याअंतर्गत कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी 12 ते 16 आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. कोविन पोर्टलवरही दुसरा डोसचा पर्याय 84 दिवसानंतर दिसेल. तर गरोदर महिलेला लसीकरणासाठी कोणताही पर्याय अद्यापही उपलब्ध नाही.