Corona Vaccination : आता 45 पेक्षा जास्त वयाचा कुणीही घेऊ शकतो व्हॅक्सीन, जाणून घ्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया, शुल्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून एक एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्व लोकांना कोरोना व्हॅक्सीन घेण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे आता कुणीही व्यक्ती ज्याचे वय 45 वर्षापेक्षा जास्त आहे तो कोरोना लस घेऊ शकतो. देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला होता. तर 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली होती. सध्या खासगी हॉस्पीटलमध्ये लसीसाठी 250 रुपये द्यावे लागत आहेत. म्हणजे दोन डोससाठी पाचशे रूपये द्यावे लागतील. लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशनची पद्धत जाणून घेवूयात.

असे करा रजिस्ट्रेशन…

* सर्वप्रथम आरोग्य सेतु अ‍ॅप किंवा को-विन अ‍ॅप वेबसाईटवरून लॉगीन करा.

* आरोग्य सेतुवर मोबाईल नंबर टाका, आणि ओटीपी वर क्लिक करा.

* आरोग्य सेतु अ‍ॅपमधील को-विन टॅबवर जा आणि लसीकरण टॅबवर क्लिक करा.

* जे पेज उघडेल त्यामध्ये फोटो आयडी, क्रमांकासह पूर्ण नाव नोंदवा.

* फोटो आयडी प्रूफ म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड टाका.

* रजिस्टर बटनावर क्लिक करा.

* नोंदणी केल्यानंतर फोनवर रिप्लाय येईल.

* नोंदणीकृत व्यक्ती एका मोबाईलवर चार लोकांची नोंदणी करू शकते.

* यानंतर, कॅलेंडर आयकॉनवर क्लिक करून तारीख निवडा. लसीकरणासाठी नोंदणी करा.

* लसीकरण केंद्राची एक यादी सुद्धा दिसेल, त्यामधून एक निवडा.

* अखेर एक अपॉयमेंट सक्सेसफुल पेज येईल, ज्यामध्ये सर्व माहिती दिसेल. ती डाऊनलोड करू शकता.

* तसेच, लाभार्थी लसीच्या दुसर्‍या डोससाठी अ‍ॅपद्वारे तारीख बदलू शकतो.

* यासाठी मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करा.

* ओटीपी टाका आणि एडिट आयकॉनवर क्लिक करा.

* आता तुमच्या हिशेबाने तारीख निवडा.