Corona Vaccine | 20 % लोकांमध्ये अँन्टीबॉडी बनली नाही, बूस्टर डोसला ग्रीन सिग्नल?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना लसीकरण (Corona Vaccine) केल्यानंतर काही लोकांमध्ये अँन्टीबॉडी (Antibody) पातळी कमी असल्याचे आढळून येत आहेत. लसीकरण (Corona Vaccine) मानवी शरीरात अँन्टीबॉडी क्षमता वाढवण्याचे काम करते. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अँन्टीबॉडी पातळी कमी होत असल्याचे दिसलं आहे. त्यामुळे ज्यांच्या शरीरात लसीकरणानंतरही अँन्टीबॉडी पातळी कमी राहतेय त्या लोकांना बूस्टर डोसची (Booster dose) आवश्यकता भासेल असं रिसर्चच्या हवाल्याने एका तज्ज्ञांनी सांगितले आहे.

20 लोकांमध्ये अँन्टीबॉडी तयार झाल्या नाहीत
कोरोना लसीकरणानंतरही 20 टक्के लोकांच्या शरीरात कोविड-19 विरोधात अँन्टीबॉडी तयार झाल्या नाहीत. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, भुवनेश्वरच्या रिसर्च युनिटच्या (Bhubaneswar Research Unit) 23 टक्के स्वयंसेवकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले होते. मात्र, त्यांच्या शरीरात अँन्टीबॉडी पातळी आधीसारखी राहीली. भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सचे संचालक डॉ. अजय परिदा (Dr. Ajay Parida) यांना शिफारस दिली आहे की, कमी अँन्टीबॉडी असलेल्या लोकांना बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. काही कोविड संक्रमित लोकांमध्ये (Kovid infected people) अँन्टीबॉडीची पातळी 30 ते 40 हजारांवर आहे. लस घेतलेल्या लोकांची संख्या 50 च्या खाली आहे. जर अँन्टीबॉडी पातळी 60 ते 100 असती तर ती अँन्टीबॉडी पॉझिटिव्ह (Antibody positive) असल्याचं मानलं जातं.

 

बुस्टर डोसची गरज

भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट इंडियन SARS-COV-2 जीनोम कंसोर्टियमचा (Genome Consortium) एक भाग आहे. देशातील 28 प्रयोगशाळांचं एक नेटवर्क आहे. कोरोना व्हायरसच्या निर्माण होणाऱ्या व्हेरिएंटमधील जीनोम सीक्वेंस करण्यास सक्षम आहे. अहवालात सांगण्यात आलं की, ज्या लोकांना लसीचे दोन्ही डोस दिलेत. त्यातील अनेक लोकांची अँन्टीबॉडी पातळी चार ते सहा महिन्यांनंतर कमी होताना आढळली. लसीचे दोन्ही डोस घेऊनही ज्याची निगेटिव्ह अँन्टीबॉडी असेल त्यांना बूस्टर डोसची गरज भासणार आहे.

कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन प्रभावी
डॉ. अजय परिदा म्हणला की, क्लिनिकल चाचणी अंतिम टप्प्यात आहे.
देशातील कोविशील्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिनचा (covacin) प्रभाव 70-80 टक्केच आहे.
लसीकरण झालेल्यांपैकी 20-30 टक्के लोकांमध्ये अँन्टीबॉडी विकसित होऊ शकत नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बूस्टर डोसवर सध्या स्थगिती दिली आहे.
परंतु बूस्टर डोसची शिफारस लवकरच मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शनिवारी देशात 73.73 कोटीपेक्षा जास्त कोविड लसीचे डोस देण्यात आले अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रलायने दिली.

Web Titel :- Corona Vaccine | corona vaccine booster dose may get green signal antibodies not made 20 vaccinated people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Crime News | BoB बँकेच्या महिला अधिकार्‍याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, परिसरात प्रचंड खळबळ

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3,623 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mohd. Yakoob Shekha | याकुब शेख यांची भारताच्या हज कमिटीच्या सीईओ (CEO) पदी नियुक्ती