पुणे ग्रामीण पोलीस दलातील 2 हजार पोलिसांना दिली कोरोना लस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना पोलिसांना लस देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, लसीकरणात आतापर्यंत ग्रामीण पोलीस दलातील पावणे दोन हजार पोलिसांना लस देण्यात आली. दुसरीकडे कर्तव्य बजावत असताना 345 पोलिसांना कोरोना झाला आहे. त्यात 43 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दुर्दैवाने 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात 332 पोलीस बरे देखील झाले आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आला होती. त्यातही माहिती देण्यात आली आहे. यावेळी पोलीस उपअधिक्षक अमृत देशमुख यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

देशभरात कोरोनाचा विचार केल्यानंतर पुणे शहर व त्या मानाने जिल्हा कोरोना प्रादुर्भाव जास्त असल्याचे दिसते. या काळात देखील पोलीस, प्रशासकी यंत्रणानी रस्त्यावर उतरून काम केले. पण हे काम करत असताना त्यांना देखील कोरोनाची लागण झाली.त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर लसीकरण देखील सुरू झाले आहे. फ्रंट लाईन वर्कर यांना दिली जात आहे. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस दलातील 1 हजार 821 पोलिसांना लस दिली गेली आहे. तर एकूण पोलीस संख्याही 2 हजार 600 आहे. त्यामुळे जवळपास 80 टक्के पोलिसांना लस मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे पुण्यातल्या केवळ दोन हजार पोलिसांना लस मिळाली आहे. तर 900 जणांनी लस घेतलेली नाही.

मास्कमधून 3 कोटींचा दंड

पुणे ग्रामीण पोलिसांनी मास्क न घळणाऱ्यावर जोरदार कारवाई केली आहे. जवळपास 2 लाख 22 हजार मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 2 कोटी 92 लाख 43 हजार 577 रुपयांचा दंड केला आहे.