Coronavirus : संसर्गातून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यायची Covid प्रतिबंधक लस? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  यंदाच्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाने उद्रेक केला आहे. दुसऱ्या लाटेनंतर भारतात तिसरी लाट येणार असे आरोग्य तज्ज्ञाकडून म्हटले आहे. तर भारतात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखता येऊ शकत नाही. असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. तर या संकटात अतिशय भयावह कोरोनाला रोखण्यासाठी केवळ एक उपाय म्हणजे लसीकरण करणे होय.

अधिक लोकांनी लस घेणे आवश्यक –

भारतात सरकारने १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याच्या मोहिमेला १ मे पासून प्रारंभ करण्यात आला आहे. अनेक लोक कोरोना प्रतिबंधक लस घेत आहेत. मात्र बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की, जर आपण ही लस घेण्यासाठी नोंदणी केली, तर लस घेण्यापूर्वी व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल तर त्या कोरोनापासून बरे झाल्यानंतर किती दिवसानंतर कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे यासंदर्भात जाणून घ्या.

कोरोनाशी तोंड देत असताना रोगप्रतिकार शक्ती मिळवण्याचा मार्ग लस..

कोरोना विषाणूंविरूद्ध प्रतिकारशक्ती मिळविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लस घेणे हा आहे. देशात वापरल्या जाणार्‍या सर्व लसी कोरोनाची लक्षणे, रोगाची तीव्रता आणि बरे होण्याची वेळ ८० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास प्रभावी आहेत. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर व्यक्तीला कोरोनाची लागण होणार नाही याची शाश्वती नाही, मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतल्यानंतर जर व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला तर ते अगदी सौम्य लक्षणे असणार आहे. यामुळे, ही लस घेणे अधिक आवश्यक असणार आहे.

कोरोना संसर्गापासून बरे झाल्यानंतर २ ते ४ आठवड्यांनी लस घेणे आवश्यक..

एखाद्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास त्या व्यक्तीच्या शरीरात नैसर्गिक प्रतिकारशक्ती तयार होते. तर जी सामान्यपणे ९० ते १८० दिवस ते तसेच टिकून राहते, तर नैसर्गिक प्रतिकारशक्तीची वेळ व्यक्तीनुसार बदलू शकते. जरी नैसर्गिक प्रतिकारशक्तीची वेळ विविध व्यक्तींमध्ये असते, मात्र, आपणाला कोरोना संसर्ग कसा झाला? हे सुद्धा यावर अवलंबून असते. मात्र, पूर्णपणे रिकव्हर झाल्यानंतर २ ते ४ आठवड्यांनंतर कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे.

या दरम्यान, जेव्हा व्यक्ती कोरोनाची लागण झाल्यानंतर बरे होते. तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना विषाणूविरूद्ध लढणारी नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण होते. या अशा परिस्थितीमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीपासून मिळणारी प्रतिकारशक्ती व्यक्तीसाठी अधिक फायदेशीर असणार नाही. यामुळे, ज्यावेळी नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमकुवत होत असते, त्यावेळी कोरोना लसीकरण करण्याचा फायदा जास्त चांगला होणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसनंतर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास, तर बरे झाल्यानंतर २ आठवड्यांनी त्या व्यक्तीने दुसरा लसीचा डोस घेणे आवश्यक असते.