मोदी सरकारचा कोरोना Vaccine चा प्लॅन आला ! सुरूवातीला वॅक्सीनवर 18 हजार कोटी रूपये होऊ शकतात खर्च

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात ज्याप्रकारे निवडणुकीसाठी पोलिंग बूथ उभारले जातात, तशाच प्रकारे वॅक्सीनसाठी बूथ बनवण्याचा प्लॅन आहे. सीएनबीसी आवाजने हे वृत्त सूत्रांच्या संदर्भाने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार सुरूवातीला वॅक्सीनवर 18,000 कोटी रूपये खर्च करू शकते, कोरोना वॅक्सीनच्या एका डोसवर 210 रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. पोलिंग बूथप्रमाणे टीम गठित केल्या जातील. ब्लॉक लेव्हलवर रणनिती तयार केली जाईल. सरकारी आणि खासगी डॉक्टरांना या अभियानाची विशेष जबाबदारी दिली जाईल. सोबतच लोकसहभागाच्या प्रयत्नासह त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल.

पुढील वर्षी जुलैपर्यंत वॅक्सीनचे 50 कोटी डोस बनवणे आणि 25 कोटी लोकांचे लसीकरण करण्याची भारताची योजना आहे. सूत्रांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांचे लसीकरण होईल. वॅक्सीनचे दोन डोस द्यावे लागतील. अशावेळी एका डोसवर 210 रुपये आणि दोन डोसवर 420 रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येत लसीकरणावर 50 हजार कोटी रूपयांचा खर्च येऊ शकतो. मात्र, अजूनपर्यंत कोरोना वॅक्सीनची किंमत ठरलेली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिकतेच्या आधारावर हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि सीनियर सिटिझन्सला वॅक्सीन देण्याची तयारी आहे. पहिल्या टप्प्यात वॅक्सीन ज्यांना दिली जाईल, त्यांना एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण सांगितले जाईल. मॅसेजमध्ये लस देणारी संस्था आणि हेल्थ वर्करचे नाव सुद्धा असेल.

लसीकरणाचे मॉनिटरिंग कसे होणार?

योग्य वेळी दोन डोस देण्यासाठी मंत्रालयाने कोरोना वॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्क तयार केले आहे. हे 2015 मध्ये सुरू केलेले इलेक्ट्रॉनिक वॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्कच आहे. कोट्यवधी मुलांपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय वॅक्सीन पोहचण्यात ही सिस्टम मदत करेल. याद्वारे पहिला डोस दिल्यानंतर दुसर्‍या डोससाठी एसएमएस पाठवला जाईल. जेव्हा लसीकरण पूर्ण होईल तेव्हा डिजिटल क्यूआर आधारित एक सर्टििफिकेट सुद्धा जनरेट होईल. हे सर्टिफिकेट व्हॅक्सीन दिल्याचा पुरावा असेल.

सर्व लोकांना कधी मिळेल व्हॅक्सीन?

सर्व लोकांपर्यंत व्हॅक्सीन पोहचण्यासाठी अजून सुमारे पाच ते सहा महिन्यांचा वेळ लागू शकतो. कारण अजूनपर्यंत सुद्धा जेवढ्या वॅक्सीन तिसर्‍या टप्प्यात यशस्वी झाल्या आहेत त्या सर्वांचे मास प्रॉडक्शन पुढील वर्षापासूनच सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, मोदीजींनी आतापासून राज्यांना वॅक्सीनसाठी कोल्ड स्टोरेज चेन स्थापन करण्यास सांगितले आहे.