Covid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस पुरेसा – स्टडीमध्ये दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना (Corona Virus) बाबत रोज नवनवीन स्टडी समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आणखी एक संशोधन Research समोर आले आहे, ज्यानुसार कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा Corona Vaccine केवळ एकच डोस पुरेसा आहे. हैद्राबादच्या एआयजी हॉस्पिटलकडून AIG Hospital रिलिज करण्यात आलेल्या स्टडीत याबाबत खुलासा झाला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

हॉस्पिटलकडून सांगण्यात आले की, 5 जानेवारीपासून 16 जानेवारीदरम्यान व्हॅक्सीन घेणार्‍या 260 आरोग्य कर्मचार्‍यांवर अभ्यास करण्यात आला होता, जेणेकरून सर्व रूग्णांमध्ये प्रतिकारशक्ती स्मृती प्रतिक्रियेचे मुल्यांकन करता येऊ शकते. या सर्व रूग्णांना कोविशील्ड व्हॅक्सीन देण्यात आली होती.

या स्टडीत दोन महत्वाच्या गोष्टी समोर आल्या.
पहिली ही की, कोरोना संक्रमित लोकांनी त्या लोकांपेक्षा जास्त चांगली अँटीबॉडीची प्रतिक्रिया दाखवली जे कोरोनाने संक्रमित झाले नव्हते.
सोबतच हे सुद्धा समजले की, सिंगल डोस घेतल्यानंतर संक्रमित लोकांमध्ये मेमरी टी सेल प्रतिक्रियांशिवाय संक्रमित लोकांच्या तुलनेत जास्त होती.

संशोधनाच्या सह लेखकांपैकी एक आणि एआयजी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांनी म्हटले की,
निष्कर्ष सांगतात की, कोरोना संक्रमितांसाठी व्हॅक्सीनचा Corona Vaccine एकच डोस पुरेसा आहे.
त्यांना व्हॅक्सीनचे दोन डोस देण्याची आवश्यकता नाही.

तर देशातील वेगवेगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलने म्हटले की,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घोषित करण्यात आलेल्या नवीन धोरणांतर्गत कोविड-19 लसींच्या खरेदीबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
आणि यामुळे त्यांच्या केंद्रांवर लसीकरण स्थगित करावे लागले आहे.

या हॉस्पिटल्सने लसीच्या खरेदीसाठी एक योग्य तंत्र आणि एक खिडकी प्रणाली स्थापन करण्याची मागणी केली आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल्सने सुद्धा दावा केला आहे की, त्यांनी लस बनवणारे मॅन्युफॅक्चरर सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया Serum Institute of India आणि भारत बायोटेकच्या सोबत राज्य सरकारांना संपर्क केला, परंतु यश आले नाही.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : corona vaccine one dose sufficient for people who got infected from corona

हे देखील वाचा

Five Police Officer Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना