Corona Vaccine Registration : 18 ते 44 वर्षाच्या लोकांसाठी आजपासून सुरू होणार ऑनलाइन रजिस्ट्रेशन, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात 1 मेपासून कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा सुरू होणार आहे. याच शनिवारपासून 18 वर्ष ते 44 वर्षांचे लोक सुद्धा कोरोना लस घेण्यास पात्र होतील. यापूर्वी 45 वर्षाच्या वरील लोकच लस घेऊ शकत होते. 18 ते 44 वयाच्या लोकांना कोरोना व्हॅक्सीन घेण्यासाठी आजपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असेल. सरकारने स्पष्ट केले आहे की, या लोकांना वॉक-इन म्हणजे लसीकरण केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा मिळणार नाही. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपचा वापर करू शकता. लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनच मान्य आहे.

काय आहे प्रोसेस ?
* कोरोना व्हॅक्सीनेशनसाठी 18-44 वर्षाचे लोक आजपासून कोविन पोर्टल cowin.gov.in किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करू शकतात.
* अ‍ॅपवर किंवा वेबसाइटवर जाऊन मोबाईल नंबर नोंदवा.
* मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी दिला जाईल. हा ओटीपी व्हेरिफाय करावा लागेल.
* यानंतर तुम्ही व्हॅक्सीनेशनसाठी रजिस्ट्रेशन पेजपर्यंत पोहचाल. येथे तुम्हाला फोटो आयडी प्रूफची माहिती भरावी लागेल.
* फोटो आयडी प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा पेन्शन पासबुक सिलेक्ट करू शकता.
* यानंतर तुम्हाला आयडी प्रूफचा नंबर, नाव, जेंडर आणि जन्म वर्ष नोंदवावे लागेल.
* सर्व माहिती भरल्यानंतर रजिस्टर बटनवर क्लिक करावे लागेल.
* रजिस्ट्रेशननंतर जवळचे व्हॅक्सीनेशन सेंटर निवडण्यासाठी पिनकोड टाकून शेड्यूल आणि केंद्र निवडावे लागेल.
* येथे व्हॅक्सीनेशन डेट आणि टायमिंगची माहिती मिळेल. अशाच प्रकारे आरोग्य सेतु अ‍ॅपवर सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता.

व्हॅक्सीनची किंमत
हैद्राबाद येथील भारत बायोटेकने आपली कोविड-19 लस ‘कोव्हॅक्सीन’ ची किंमत राज्य सरकारांसाठी 600 रुपये प्रति डोस आणि खासगी हॉस्पिटलसाठी 1,200 रुपये प्रति डोस ठरवली आहे. तर पुणे येथील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने आपल्या कोविड-19 लस ’कोविशील्ड’ ची किंमत राज्य सरकारांसाठी 400 रुपये प्रति डोस आणि खासगी हॉस्पिटलसाठी 600 रुपये प्रति डोस जाहीर केली आहे. दोन्ही लसी 150 रुपये प्रति डोसच्या दराने केंद्र सरकारला उपलब्ध होतील.

देशात आतापर्यंत देण्यात आले 14.77 कोटी डोस
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची सुरूवात झाली आहे. ज्यानंतर आतापर्यंत एकुण 14.77 कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. सध्या मंगळवारी 24 लाखापेक्षा जास्त डोस देण्यात आले. आरोग्य मंत्रालयानुसार रात्री आठ वाजेपर्यंत एकुण 14 कोटी 77 लाख 27 हजार 54 डोस दिले गेले आहेत.