Corona Vaccine : भारत यशाच्या जवळ असल्याचं मोदींनी सांगितलं, जाणून घ्या किंमत आणि लसीकरणाबद्दलच्या 10 महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीबाबत शुक्रवारी एक मोठे विधान केले. पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले की, येत्या काही आठवड्यांत भारताला लस मिळू शकेल, देशातील शास्त्रज्ञ मोठ्या यशाच्या जवळ आहेत. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी लशीची किंमत, तिचे वितरण आणि राज्यांसह समन्वय यावर उघडपणे चर्चा केली. सर्वपक्षीय बैठकीला डझनहून अधिक राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी लसीबद्दल काय म्हटले, दहा मोठ्या मुद्द्यांविषयी जाणून घ्या…
1. भारत लस बनवण्याच्या अगदी जवळ आहे आणि देशातील शास्त्रज्ञ खूप उत्सुक आहेत. देशाला पुढील काही आठवड्यांतच लस मिळू शकते.

2. देशात एकूण आठ लशींवर चाचणी सुरू आहे, कारण 3 लसी भारतात तयार केल्या जात आहेत, तर जगातील अनेक लसी भारतात तयार केल्या जात आहेत.

3. भारताने Co-WiN नावाचे एक विशेष सॉफ्टवेअर तयार केले आहे. ज्यामध्ये कोरोना लशीशी संबंधित सर्व स्टॉक आणि त्यासंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध असेल.

4. एक नॅशनल एक्सपर्ट ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. पीएम मोदी यांच्या म्हणण्यानुसार या ग्रुपमध्ये केंद्रातील लोक, राज्य सरकारचे लोक आणि तज्ज्ञ यांचा समावेश आहे. हा ग्रुप एकत्रितपणे कोरोना लशीच्या वितरणाविषयी निर्णय घेईल.

5. वृद्ध, कोरोना वॉरियर्स आणि अधिक आजारी लोकांना कोरोनाची लस प्रथम दिली जाईल. वितरणासाठी एक धोरण तयार केले जाईल, ज्या अंतर्गत वेगवेगळे टप्पे असतील.

6. लशीची किंमत काय असेल यावर केंद्र आणि राज्य एकत्रितपणे निर्णय घेतील. किमतीचा निर्णय लोकांना विचारात ठेऊन घेतला जाईल आणि त्यात राज्यांचा सहभाग असेल.

7. केंद्र आणि राज्य यांची टीम एकत्रितपणे लस वितरित करण्यासाठी कार्य करतील. जगातील लस वितरित करण्याच्या क्षमतेपैकी सर्वाधिक उत्तम क्षमता भारतामध्ये आहे.

8. देशाच्या कानाकोपऱ्यात लस पोहोचवण्यासाठी कोल्ड चैन बळकट करावी लागेल. यावर केंद्र आणि राज्ये एकत्र काम करत आहेत.

9. भारत आज त्या देशांमध्ये आहे, जिथे दररोज जास्तीत जास्त चाचण्या होत आहेत. तसेच रिकव्हरीचे प्रमाणही सर्वाधिक आहे आणि मृत्यूची संख्याही कमी होत आहे.

10. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात विकसित देशांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे, परंतु भारताने एक राष्ट्र म्हणून चांगले काम केले आहे. तसेच राजकीय पक्षांनी लस वितरणाशी संबंधित कोणत्याही अफवा पसरवणे थांबवावे.