Fact Check : WhatsApp वरून देखील कोरोना लशीसाठी रजिस्ट्रेशन करता येते ? जाणून घ्या सत्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोना लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर बाधितांच्या संख्येतही वाढ होत असल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक जण लस घेण्यासाठी नोंदणीच्या प्रतिक्षेत आहे. सध्या लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना को- विन पोर्टल किंवा आरोग्य सेतू ॲपच्या मदतीने नोंदणी करण्यात येत आहे. परंतु, हॉट्सॲपच्या माध्यमातून लसीकरण नोंदणी करा असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने हा मेसेज खोटा असून लोकांनी वेळीच सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर आलेल्या या मसेजमध्ये व्हॉट्सॲपद्वारेही आता आपण लसीकरणासाठी नोंदणी करु शकता. अगदी चॅटींग करण्यासारखी साेपी पद्धत आहे. ज्यांना नोंदणी करायची आहे. त्यांनी ९७४५६९७४५६ या नंबरवर Hi असा मेसेज टाका. त्यानंतर आम्ही जस सांगतो त्याप्रमाणे फॅालो करण्यास सांगितले जात आहे. सुरुवातीला या नंबरवरून आधारकार्डवरील माहिती मागविली जाते. त्यांनतर आपण राहत असलेल्या परिसराचा पिनकोड नंबर मागितला जातो. यामुळे यावर लोकांचा पटकन विश्वास बसत आहे. पण हा मसेसेज खोटा असून अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणाऱ्या या मेसेजमधील दावा खोटा असल्याचे सांगितले असून, यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये लसीकरणाची नोंदणी केवळ को-विन पोर्टल आणि आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारेच करता येईल. त्यामुळे कोणीही लसीकरणाच्या नोंदणीबद्दल व्हॉट्सअ‍ॅपवरून तुम्हाला सांगत असेल तर अशा लोकांपासून सावध रहा,ते तुम्हाला फसवू शकतात, असा सल्लादेखील देण्यात आला आहे.
सध्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी को-विन ॲप किंवा आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून नोंदणी करावी लागत आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स. तर दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त मात्र गंभीर आजार असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देण्यात आली.