सर्वात पहिले आणि मोठया प्रमाणावर कोरोनाविरुद्धची लस निर्मिती करणार, पुण्यातील सीरम इस्टिट्यूटचा दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ऑक्सफर्डने कोरोना विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी लस तयार केली आहे. तसेच ऑक्सफर्डने तयार केलेल्या कोरोना लसची निर्मीती अधिक प्रमाणात पुण्यातील सीरम इस्टिट्यूट करणार आहे, असा दावा केला आहे. कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. अद्याप या विषाणूचे वाढते संक्रमण रोखणे जगासमोर आव्हान आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये कोरोना लस तयार करण्याबाबत संशोधन सुरू असून त्याच्या मानवी चाचणी केली जाताहेत. यात ऑक्सफर्डची कोरोना लस मानवी चाचणीत यशस्वी झालीय. तर, रशिया देशानेही कोरोना लस तयार केली आहे. तसेच त्याची मानवी चाचणी घेतलीय.

यातच पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी म्हटले आहे की, सर्वात पहिले आणि सर्वात मोठ्या प्रमाणावर ऑक्सफर्डने तयार केलेल्या कोरोना लसची निर्मीती करणार आहे. अदार पूनावाला म्हणाले, ’असे फार कमी लोक आहेत, जे एवढ्या कमी कालावधीत आणि एवढ्या कमी किमतीत कोरोना लसीचे अधिक प्रमाणावर उत्पादन करू शकतील. कोरोना लसीच्या पहिल्या खेपेसाठी मला देश-विदेशातून अनेक नेत्यांचे फोन येताहेत. मला त्यांना समजून सांगावे लागत आहे की, मी तुम्हाला अशीच लस देऊ शकत नाही.’

प्रति मिनिट 500 डोस तयार करणार
ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांसोबत कोरोना लस तयार करण्याच्या कामात सीरम इंस्टिट्यूटने एप्रिल महिन्यात लस तयार करण्याचा दावा केला होता. आता कंपनीत प्रति मिनिट 500 डोस तयार होत आहेत. मात्र, ही लस किती अधिक प्रमाणावर तयार होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भारताची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे या देशात कोरोना लसची गरज भासणार आहे. अशात पूनावाला भारत आणि इतर देश यांच्यात 50-50 पद्धतीनेही विभागणी करू शकतात.

एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तयार करत असलेल्या कोरोना लसच्या चाचण्यांचे परिणाम अत्यंत उत्साहवर्धक आहेत. एस्ट्राजेनेकाला ही लस तयार करण्यासाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाची साथ मिळालीय. कंपनीचे सीईओ अदार पूनावाल म्हणाले, त्यांना क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यासाठी लवकर लायसन मिळेल, अशी आशा आहे. यानंतर तिसर्‍या टप्प्यावरील मानवी चाचणीला सुरुवात करण्यात येईल. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस निर्माता कंपनी असून ही कंपनी दरवर्षी 1.5 अब्ज लसींचे डोस तयार करते. परवानगी मिळताच आम्ही लसीचे परीक्षण सुरू करू. याचबरोबर आम्ही अधिक प्रमाणावर लसीचे उत्पानही सुरू करू. याच वर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही लस तयार करू. याबाबत घाई करण्याऐवजी गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित लस तयार करणे, हा कंपनीचा उद्देश आहे, सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले आहे.