खुशखबर ! ‘कोरोना’विरूध्दची पहिली स्वदेशी लस ‘कोवॅक्सिन’ला मंजूरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासाठी सर्वात मोठी बातमी आहे. कोरोना लशीच्या (Corona Vaccine) आपात्कालीन वापराला (Emergency Use) मंजूरी मिळाली आहे. मेड इन इंडिया कोरोना लस COVAXIN ला परवानगी देण्यात आली आहे. ही पहिली स्वदेशी लस आहे. जिच्या आपात्कालीन वापराला मंजूरी देण्यात आली आहे. हैदराबदाच्या भारत बायोटेकनं (Bharat biotech) तयार केलेली ही लस

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं (Central Drugs Standards Control Organisation) च्या तज्ज्ञांच्या समितीने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिला इमर्जन्सी युझसाठी परवानगी दिली आहे. या समितीने आता DCGI कडे शिफारस केली आहे. आता DCGI निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे.

भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजे BBV152 ही लस विकसित केली आहे. ही लस यूकेत (UK) आढळलेल्या नव्या कोरोना व्हायरस विरोधातही प्रभावी आहे, अशी माहिती याआधीच कंपनीनं दिली आहे. त्यामुळे या लशीला मंजुरी म्हणजे नव्या कोरोना व्हायरसलाही टक्कर देण्याच्या दिशेनं सरकारनं उचलेलं सर्वात मोठं पाऊल आहे.