Corona Vaccine : WHO नं सांगितलं, निरोगी आणि तरूणांना कधीपर्यंत मिळणार ‘कोरोना’ वॅक्सीन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना वॅक्सीनसाठी जगभरात प्रतिक्षा सुरू आहे. मात्र, जगभरात वॅक्सीनच्या ह्यूमन ट्रायल सुरू आहेत आणि आशा आहे की, या वर्षाच्या अखेरपर्यंत वॅक्सीन उपलब्ध होऊ शकते. या दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, निरोगी आणि तरूण व्यक्तींना कोरोना व्हायरस वॅक्सीन मिळण्यासाठी 2022 पर्यंत वाट पहावी लागेल. आरोग्य कर्मचारी आणि उच्च जोखिम असणार्‍यांना प्रधान्य दिले पाहिजे.

स्वामीनाथन यांनी द गार्डियनचा संदर्भ देत म्हटले की, बहुतांश लोक याच्याशी सहमत आहेत की, लसीकरण प्रथम आरोग्य देखभाल करणारे कर्मचारी आणि फ्रंट-लाइन कर्मचार्‍यांपासून सुरू होत आहे, यात सुद्धा हे निश्चित करण्याची गरज आहे की, त्यांच्यापैकी कोण जास्त जोखिममध्ये आहेत, यामध्ये ज्येष्ठांना प्राथमिकता असेल.

कोरोना वॅक्सीनसाठी जागतिकदृष्ट्या डझनभर वॅक्सीन कँडीडेटचे क्लीनिकल परीक्षण आणि या वर्षाच्या सुरूवातीच्या लसीकरणाच्या अपेक्षेशिवाय, डब्ल्यूएचओच्या शास्त्रज्ञांनी पुनरूच्चार केला की, मोठ्या प्रमाणात शॉट्सची शक्यता नव्हती. याशिवाय, सुरक्षित वॅक्सीनच्या शोधात सर्वात अगोदर कोण बाजी मारणार, यावर त्यांनी म्हटले की, सध्या यावर काम सुरू आहे.

डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञांनी सांगितले की, निरोगी आणि तरूणांना कोरोना व्हायरस वॅक्सीन मिळवण्यासाठी 2022 पर्यंत वाट पहावी लागेल, कारण सार्वजनिक आरोग्य अधिकारी प्रथम ज्येष्ठ आणि अन्य कमजोर वर्गाच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करतील. स्वामीनाथन यांना आशा आहे की, 2021 पर्यंत कमीतकमी एक प्रभावी लस असेल, परंतु ती केवळ मर्यादित प्रमाणात उपलब्ध असेल.

आरोग्य मंत्रालयाने गुरूवारी सांगितले की, भारतात मागील 24 तासांच्या दरम्यान कोरोनाची एकुण 67,708 प्रकरणे समोर आली आहेत, ज्यानंतर देशात कोरोना संक्रमित लोकांची संख्या वाढून 73,07,097 पर्यंत पोहचली आहे.