Corona Vaccine | कोरोना व्हॅक्सीन घेण्यात महिला मागे, 1000 पुरुषांमागे 854 ने घेतली लस

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाची दुसरी लाट कमजोर होताना दिसत असली तरी तिसर्‍या लाटेची चाहूल लागल्याने प्रत्येकाची अस्वस्थता वाढली आहे. कोरोना (Corona Vaccine) महामारीच्या या काळात व्हॅक्सीनकडेच सर्वात मोठे शस्त्र म्हणून पाहिले जात आहे.

याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकांना अनेकदा आवाहन केले आहे, जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी. मात्र, सरकारचे हे प्रयत्न सुरू असताना व्हॅक्सीन घेण्यात महिला खुपच मागे दिसत आहेत. भारतात आतापर्यंत जेवढ्या लोकांनी व्हॅक्सीन घेतली आहे त्यामध्ये 1000 पुरुषांच्या मागे 854 महिला आहेत. या पाठीमागे स्त्री-पुरूष प्रमाण सुद्धा कारण असल्याचे म्हटले जात आहे.

कोरोना लसीकरण अभियानात बहुतांश राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला कमी व्हॅक्सीन घेत आहेत. केरळ आणि छत्तीसगढ अशी राज्य आहेत जिथे पुरुषांपेक्षा जास्त महिलांनी लस घेतली आहे. छत्तीसगढमध्ये प्रौढांच्या लोकसंख्येचे लिंग प्रमाण प्रति 1,000 पुरुषांच्या मागे 1,013 महिलांचे आहे, परंतु लसीकरणाच्या लोकसंख्येत महिलाचे प्रमाण 1,000 पुरुषांमागे 1,045 महिला आहे. केरळात सुद्धा काहीसे असेच आहे. केरळात पौढ लोकासंख्येचे लिंग प्रमाण 1000 पुरुषांच्या पाठीमागे 1,126 महिला आहे, तर लस घेण्यात 1000 पुरुषांच्या पाठीमागे 1,087 महिलांनी व्हॅक्सीन घेतली आहे.

इतर राज्यांमध्ये महिलांच्या कमी लसीकरणाचे कारण, त्या घरातून बाहेर पडत नाहीत हे सांगितले जात आहे. सोबतच महिला ऑनलाइन आपले स्लॉट बुक करण्यात असमर्थ दिसत आहेत. ज्या राज्यांमध्ये पुरुष आणि महिलांचे लिंग प्रमाण खुप चांगले आहे तिथे लसीकरणात लिंग विषमता कमी आहे. हिमाचल प्रदेशात व्हॅक्सीन घेणार्‍यांमध्ये 50% महिला आहेत. राजस्थानमध्ये जिथे लोकसंख्येतील 30 टक्के लोकांना कोरोना व्हॅक्सीन दिली गेली आहे तिथे 48 टक्के महिलांना लस दिली गेली आहे.

कमी लसीकरणाचा कव्हरेज म्हणजे हे असू शकते की,
उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये लैंगिक विषमता जास्त आहे.
यूपीमध्ये  केवळ 12% प्रौढ लोकसख्येचे लसीकरण केल आहेत.
उत्तर प्रदेशात प्रौढ लिंग प्रमाण 1000 पुरुषांच्या पाठीमागे 936 महिला आहेत,
तर येथे 1000 पुरुषांच्या पाठीमागे केवळ 746 महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

 

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

 

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

 

कोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू

 

केसांचे सौंदर्य खुलावण्यासाठी आवश्य करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

 

परमबीर सिंह यांच्याविरूध्द आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल, जाणून घ्या प्रकरण

 

‘हे’ उपाय करा… आणि कोपरांचा काळपवटपणा करा नाहीसा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Corona Vaccine | women get left behind in covid 19 vaccination drive 854 women got vaccinated out of 1000 men