कोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या ! ‘या’ रिपोर्टने वाढवली चिंता

पोलीसनामा ऑनलाइन टीम (policenama online) – कोरोना व्हॅक्सीनच्या corona vaccine सातत्याने समोर येत असलेल्या साईड इफेक्ट्सवर संपूर्ण जगाची नजर आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये सुमारे 4000 महिलांना व्हॅक्सीन घेतल्यानंतर पीरियडशी (मासिकपाळी) संबंधीत समस्या झाली आहे. व्हॅक्सीनवर लक्ष ठेवत असलेल्या एक्सपर्ट्सने असा दावा केला आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितले की, प्रामुख्याने 30 ते 49 वर्षाच्या महिलांमध्ये व्हॅक्सीन घेतल्यानंतर ही समस्या जास्त दिसून आली आहे. corona vaccine women report menstrual problems with heavy bleeding and delayed periods after vaccination

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

रिपोर्टनुसार, महिलांना सामान्य प्रकारे होणार्‍या ब्लिडिंगपेक्षा जास्त फ्लो होत आहे आणि काही महिलांमध्ये उशीराने मासिकपाळी येण्याची समस्या सुद्धा दिसून आली. मेडिसिन अँड हेल्थकेयर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (MHRA) नुसार, 17 मेपर्यंत अ‍ॅस्ट्राजेनेका शॉटशी संबंधीत असे 2,734 रिपोर्ट नोंदले गेले आहेत.

मात्र, हा दावा केवळ अ‍ॅस्ट्राजेनेका व्हॅक्सीनबाबत केलेला नाही. फायजरच्या व्हॅक्सीनमुळे मासिकपाळीत बदल झाल्याची 1,158 प्रकरणे समोर आली आहेत. तर 66 प्रकरणांमध्ये मॉडर्नाचा संबंधी आहे. एक्सपर्ट म्हणत आहेत की, ही संख्या आणखी जास्त असू शकते, कारण मासिकपाळीशी संबंधीत या समस्येचे अनेक आकडे नोंदले जात नाहीत.

ब्रिटनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र ’दि संडे टाइम्स’ने MHRA च्या कोविड साईड इफेक्ट्सच्या यादीत मासिक पाळीशी संबंधीत समस्यांचा समावेश न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
मात्र, रेग्युलेटरने यावर म्हटले की, एका रिव्ह्यूमध्ये हा निष्कर्ष समोर आला आहे की,
नुकत्याच व्हॅक्सीनेट झालेल्या महिलांमध्ये ही समस्या खुप व्यापक स्तरावर आढळून आली नाही.
याबाबत बारकाईने तपासणी केली जाईल.

Amit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….

MHRA च्या चीफ एग्झीक्यूटिव्ह डॉ. जून रायने यांनी म्हटले आम्ही हेल्थ एक्सपर्टच्या मदतीने मेंस्ट्रुअल डिसऑर्डर,
अनियमित प्रकारे होत असलेले वजायनल ब्लिडिंग आणि व्हॅक्सीनेशनच्या साईड इफेक्टच्या रिपोर्टचा रिव्ह्यू केला आहे.
ब्रिटनमध्ये देण्यात येत असलेल्या तिनही व्हॅक्सीनचे सध्याचे आकडे हा धोका वाढण्याकडे संकेत करत नाहीत.

डॉ. रायने यांनी म्हटले, अशा महिलांची संख्या खुप कमी आहे, ज्यांनी व्हॅक्सीन घेतल्यानंतर मेंस्ट्रुअल डिसॉर्डरचा सामना केला.
आम्ही या समस्येचे संकेत समजून घेण्यासाठी रिपोर्ट बारकाईने मॉनिटर करत आहोत.

रिपोर्टनुसार, 30 ते 49 वर्षाच्या सुमारे 25 टक्के महिलांना मासिक पाळीशी संबंधीत समस्या जाणवल्या आहेत.
यामध्ये ब्लिडिंग फ्लो सामान्य ते कमी किंवा जास्त, मासिक पाळी वेळेच्या आधी किंवा
उशीराने येणे अणि पोटात काळा येणे अशा समस्यांचा समावेश होऊ शकतो.
तसचे, मेडिकल कन्डीशन किंवा मेडीकेशनमुळे सुद्धा होऊ शकते.

ब्रिटनप्रमाणे अमेरिकेमध्ये सुद्धा व्हॅक्सीनेशनच्या नंतर अशाप्रकारच्या समस्या दिसून आल्या आहेत,
परंतु शास्त्रज्ञांनी तेव्हा म्हटले होते की, यावर सध्या काहीही बोलणे घाई ठरू शकते.
मात्र, जगभरात व्हॅक्सीनच्या योग्य अ‍ॅक्सेसबाबत काम करत असलेल्या इंटरनॅशनल व्हॅक्सीन अलायन्स GAVI नुसार, असे शक्य होऊ शकते.
एक्सपर्ट म्हणतात की, दुसर्‍या व्हायरससाठी तयार केलेल्या व्हॅक्सीनने सुद्धा अनेकदा मासिक पाळीशी संबंधीत समस्या होतात.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : corona vaccine women report menstrual problems with heavy bleeding and delayed periods after vaccination

हे देखील वाचा

पुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या

Shivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या