UK एक्सपर्टचा दावा : भारतातून पसरलेल्या कोरोनाच्या B1.617.2 व्हेरियंटवर व्हॅक्सीन सुद्धा प्रभावी नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – ब्रिटन (यूके) मध्ये कोरोनापासून बचावासाठी दिली जात असलेली लस व्हायरसच्या बी1.617.2 व्हेरिएंटला पसरण्यापासून रोखण्यात कमी प्रभावी आहे. ब्रिटनचे एक प्रमुख शास्त्रज्ञ जे यूकेच्या लसीकरण कार्यक्रमाचा भाग आहेत, त्यांनी हा दावा केला. काही लोकांचे म्हणणे आहे की, कोरोनाचा बी1.617.2 व्हेरियंट सर्वप्रथम भारतात आढळला.

न्यूज एजन्सीनुसार, कोरोनाच्या बी1.617.2 व्हेरियंटच्या प्रकरणांची संख्या यूकेमध्ये एक आठवड्याच्या आत दुप्पट झाली आहे. अशावेळी देशाच्या ज्या भागात व्हायरसचा हा व्हेरियंट वेगाने पसरू लागला आहे, तिथे चाचण्या आणि लसीकरणाला वेग देण्यात येत आहे.

आकड्यांच्या प्रतिक्षेत ब्रिटीश सरकार
ब्रिटनमध्ये पसरत असलेल्या कोरोनाच्या व्हेरियंटबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर अँथनी हार्डेन यांनी म्हटले की, यामुळे देशात अनलॉक करण्याच्या प्लॅनमध्ये अडथळे येऊ शकतात, कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही की, हा व्हेरियंट किती वेगाने पसरणार आहे. सोबत त्यांनी दावा केला की, व्हॅक्सीन नवीन व्हेरियंटविरूद्ध कमी प्रभावी असू शकते.

यापूर्वी यूकेचे पीएम बोरिस जॉन्सन यांनी म्हटले होते की, सरकार त्या आकड्यांची प्रतिक्षा करत आहेत जे सांगतील की, नवीन व्हेरियंट दुसर्‍या व्हेरियंटच्या तुलनेत जास्त पसरणारा आहे. तर ब्रिटीश आरोग्य मंत्रालयाने म्हटले, बी1.617.2 व्हेरियंट उत्तर पश्चिम इंग्लंड आणि लंडनमध्ये पसरू लागला आहे.

या दरम्यान ब्रिटनने आता कोविशील्डचे दोन्ही डोस देण्यामधील अंतर कमी केले आहे. आता दोन्ही डोसमधील गॅप 8 आठवड्यांची केली आहे. मात्र, हा नियम 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठीच लागू आहे. यापूर्वी हे अंतर 12 आठवड्यांचे होते.