Corona Vaccines | कोरोना लसींची मुदत संपणार असल्याने 50 हजाराहून अधिक लस वाया जाण्याची भीती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. नागरिकांना याच लसींचे डोस (Corona Vaccines) देण्यात येत आहे. मात्र आता एक नवी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईतील तीन खासगी रुग्णालयांमधील कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीच्या साठ्याची मुदत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे या लसी बदलून द्याव्यात म्हणून खासगी रुग्णालय प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभाग आणि मुंबई महापालिकेला Brihanmumbai Municipal Corporation (BMC) लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात सुमारे ५० हजाराहून अधिक लस मात्राची मुदत संपणार आहे त्यामुळे या लसी घेऊन त्या बदल्यात नवा साठा देण्यात यावा अशी मागणी केली आहे. (Corona Vaccines)
मार्चच्या पहिल्या च आठवड्यात अंधेरी येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाकडे (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) असणाऱ्या १५ ते १६ हजार लस मात्रांची मुदत संपणार आहे. तर मुलुंड व बोरिवली येथील अँपेक्स रुग्णालय समूहाकडे १० हजार लस मात्रा असून त्यांची मुदत ५ मार्चला संपणार आहे.
येत्या एक-दोन महिन्यात शहर व उपनगरांमध्ये असलेल्या खासगी रुग्णालयांकडील लसीचा बराचसा साठा कालबाह्य होणार असल्याचे खासगी रुग्णालयांचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले. (Corona Vaccines)
तांत्रिक कारणांमुळे लस साठा बदलणे अशक्य
येत्या जून मध्ये खासगी रुग्णालयांमध्ये असलेला दोन लाख लसींचा साठा कालबाह्य होणार आहे.
काही तांत्रिक कारणांमुळे पालिका खासगी रुग्णालयांना साठा बदलून देऊ शकत नाही अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
यावर तोडगा काढण्याचे काम सुरु आहे. उपाय म्हणून महापालिका प्रशासनाच्या लसीकरण केंद्रावर खासगी रुग्णालयांना जागा देण्यास तयार आहे.
त्यांनी सीएसआर अंतर्गत या ठिकाणी लसीकरण मोहीम राबवावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Web Title :- Corona Vaccines | Corona vaccines 50000 coronavirus vaccines will be wasted demand of private hospitals to change stocks as soon as possible
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold In Iron Ore | काय सांगता ! होय, गोव्यात लोहखनिजातून निघतंय सोनं