Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं यंदा ‘ढोलकी’ अन् ‘घुंगरां’चा आवाज ‘शांत’, गाव कारभार्‍यांची तमाशाकडं पाठ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्राची लोककला आणि लोकपरंपरा असलेल्या तमाशा फड मालकांना यंदा कोरोगा व्हायरसच्या थैमानामुळे आर्थिक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गावोगावी यात्रा आणि जत्रेला सुरुवात झाली असतानाही अद्यापही तमाशाचे बुकिंग 10 टक्क्यांपर्यतही झाले नाहीत. त्यामुळे तमाशा मालकांसह कलावंत हतबल झाले आहेत.

देश विदेशाासह राज्यात कोरोना व्हायरसने डोके वर काढले आहे. त्या पार्शवभूमीवर शासनाकडून यात्रा-जत्रा, सण, उत्सव बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी होळीनंतर निम्म्यापेक्षा जास्त तमाशांच्या तारखांचे बुकिंग पुर्ण झालेले असते. गर्दी टाळण्यासाठी यात्रा-जत्रा बंद ठेवण्याचा संबंधित व्यवसायिकांना आर्थिक डबघााईत घालत आहे. विशेषतः यंदा तमाशाच्या सुपारीवरही मोठा परिणाम झाला असून फडमालक धास्तावले आहेत. ऐन हंगाम सुरू होण्याच्या काळात तमाशा पंढरीत बारी ठरवण्यासाठी येणारे गावपुढारी फिरकत नसल्याचे दिसून आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी तमाशा पंढरी असलेल्या नारायणगाव येथील तमाशापंढरीवर याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे.

गावोगावी यात्रा आणि जत्रांमध्ये नागरिकांच्या करमणूकीसाठी तमाशा ठेवण्याची परंपरा आहे. गावपुढारी नारायण गावात येऊन बुकिंग करतात. मागील 80 वर्षांपासूनची ही परंपरा असल्याचे बोलले जाते.
मात्र, आता कोरोनामुळे हे तमाशाा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. गर्दी आणि कार्यक्रम टाळण्याची सल्ला सरकारने दिल्याने यात्रा, जत्रेमध्ये तमाशा न ठेवता यात्रा करण्यावर गावकारभार्‍यांचा भर आहे. त्यामुळे त्यांंच्याकडून तमाशाचे केलेले बुकिंगही रद्द केले जात आहे.

तमाशामध्ये काम करणार्‍या हजारो लोकांची उपजिविका त्यावर अवलंबून असते. गावोगावी तमाशा न झाल्यास करायच काय असा प्रश्न फड मालक आणि कलावंतांना पडला आहे. जिल्ह्यातील नारायणगाव (ता.जुन्नर ) तमाशा फडमालकांचे हक्काचे ठिकाण असून दरवर्षाी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नारायणगाव येथे 350 पेक्षा जास्त फड़ मालक गावच्या जत्रेचे करार करण्यासाठी येत असतात. या माध्यमातून सुमारे 10 कोटीं पेक्षा जास्त रकमेची उलाढाल होते. यंदा मात्र, कोरोनामुळे अद्यापर्यंत 10 टक्क्यांपर्यंतही तमाशाचे बुकिंग झाले नाही.

कोट-मायबापहो आमी जगायचं कसं, तमाशा कलावंताचा सवाल
दरवर्षी अनेक कारणांमुळे तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ येत आहे. दुष्काळ, महापूर, निवडणूका आणि यंदा कोरोगामुळे तमाशा बुकिंग झालेले नाही. सरकारच्या निर्णयामुळे यात्रा-जत्रेत तमाशा न झाल्यास मायबापहो आम्ही जगायचं कसं असा सवाल राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांनी केला आहे. राज्यभरात काळू-बाळू, संध्या माने, रघुवीर खेडकर, नांदवळकर यांच्यासह शेकडो तमाशा मालकांनी रसिकांना आनंद दिला आहे. सद्या गावपुढार्‍यांनी तमाशा कलावंतांना जगविण्यासाठी बुकिंग करावे. असं राष्टपती पदक विजेत्या मंगला बनसोडे म्हणाल्या.