Corona Violation Rules | कोरोना नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात, नवी मुंबईच्या तीन बारवर 50-50 हजार रूपयांचा दंड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Corona Violation Rules | नवी मुंबई महानगरपालिकेने Navi Mumbai Corporation (एनएमसीसी-NMCC) कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे कथित प्रकारे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन बारवर 50-50 हजार रूपयांचा दंड लावला आहे. महापालिकेच्या एका अधिकार्‍याने ही (Corona Violation Rules) माहिती दिली.

एनएमसीसीचे प्रवक्ता महेंद्र कोंडे (NMCC Spokperson Mahendra Konde) यांनी एका वक्तव्यात म्हटले की, महानगरपालिका दक्षता पथकाला गुरूवारी हे तीन बार आणि रेस्टॉरंट ठरलेल्या वेळेनंतर सुद्धा उघडे असल्याचे आढळून आले होते, ज्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

कोंडे यांनी सांगितले की, यापैकी दोन बार सीबीडी बेलापुरमध्ये (cbd belapur) आहेत तर तिसरा कोपर खैरणेमध्ये आहे.
एनएमसीसी आयुक्त अभिजीत भांगर (nmmc commissioner abhijit bangar) यांनी इशारा दिला आहे की,
जर हे बार पुन्हा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना आढळून आले तर ते एक आठवड्यांसाठी बंद करण्यात येतील.
तसेच तिसर्‍यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना कोरोनासंबंधी लॉकडाऊन असेपर्यंत बंद ठेवले जाईल.

Web Titel :- violation of corona rules had to be costly fine of 50 50 thousand rupees on three bars of navi mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 7 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Pune Police | पुण्यातील 3 पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,933 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी