‘या’ 10 सोप्या गोष्टी आहेत तुमचं सुरक्षा ‘कवच’, ‘टच’ देखील करू शकणार नाही ‘कोरोना’ व्हायरस, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने जगभरात कहर केला आहे, आतापर्यंत 3 लाख पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची प्रकरण जगभरात समोर आली आहेत. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 400 वर पोहोचली आहे तर देशात 8 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. CDC पासून WHO पर्यंत सर्वांनी कोरोनापासून वाचण्यासाठी एक समान पद्धती सांगितल्या आहेत. त्यांनी 10 असे सोपे उपाय सांगितले आहेत की ज्याने तुम्ही कोरोनापासून स्वत:चा बचाव करु शकतात.

– हात साफ ठेवण्यासाठी सॅनिटाईजर किंवा साबनाचा वापर करावा, हात किमान 20 सेकेंद स्वच्छ धुवावेत.

– खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल किंवी ट्यूशू ठेवा. आजूबाजूचा एखादा व्यक्ती शिंकल्यास लोकांनी आपल्या सुरक्षेसाठी स्वत:चे नाक तोंड रुमालाने झाकावे.

– कोणत्याही बाहेरील व्यक्तीशी हस्तांदोलन करु नका. केल्यास हात स्वच्छ धुवा.

– सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वस्तुंना हात लावू नका. अशा ठिकाणी आवश्यक काळजी घ्या. झाल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळाच.

– फळ किंवा भाज्या स्वच्छ करुन मगच त्या खा.

– जेवण तयार करताना देखील काळजी घ्या, भाज्या चांगल्या उकळा, जेवण तयार करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा.

– मांस किंवा अंडे चांगले शिजवा, कच्चे ठेवू नका.

– घर स्वच्छ ठेवा, घराचा परिसर स्वच्छ ठेवा.

– सारखे नाका, तोंडाला, डोळ्याला हातांनी स्पर्श करु नका. हात आणि चेहरा स्वच्छ धुवत रहा.

– कोणत्याही आजारी व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका. बाहेरील कोणत्याही व्यक्तीपासून 6 फूट लांब रहा.

– घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावा. N95 मास्क किंवा सर्जरी मास्कचा वापर करा.

– जेवण योग्य वेळी करा, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या पदार्थांचा जेवणात समावेश करा. तुमची रोगप्रतिकारक क्षमता जितकी चांगली तेवढी तुम्हाला व्हायरसची लागण होण्याची शक्यता कमी आहे.