Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’चा पहिला बळी, 52 वर्षीय व्यक्तीनं घेतला अखेरचा श्वास, राज्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात देखील कोरोनाचा हाहाकार चालू आहे. कोरोनामुळं देशात आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आढळलेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत 7 जणांचा बळी कोरोना व्हायरसनं गेला आहे. आज (सोमवार) पुण्यात कोरोनामुळं पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 52 वर्षीय व्यक्तीचा खासगी रूग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनामुळं महाराष्ट्रात मृत्यू होणार्‍यांची संख्या 8 वर जाऊन पोहचली आहे.

मुंबई, सांगली, पुणे-पिंपरीसह राज्यातील इतर जिल्हयांमध्ये कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणावर आढळले आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मोठी पावले उचलत आहेत. तरी देखील कोरोनाचा हाहाकार चालूच आहेत. पुण्यातील 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याने आता देशातील मृत्यूची संख्या 30 वर पोहचली आहे. पुण्यामध्ये कोरोनामुळं मृत्यू झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

You might also like