Coronavirus : कोरोनाची ‘ही’ 5 सर्वात धोकादायक लक्षणे, दिसताच जा हॉस्पिटलमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची प्रकरणे पुन्हा एकदा देशात वेगाने वाढत आहेत. कोरोनाची ही लाट पहिल्यापेक्षा जास्त घातक ठरत आहे. डॉक्टरांनुसार, नवीन कोविड स्ट्रेन जास्त संसर्गजन्य आहे, तसेच अनेक नवीन गंभीर लक्षणे घेऊन आला आहे. या दरम्यान काही रूग्ण होम क्वारंटाइनमध्ये रिकव्हर होत आहेत, तर काही प्रकृती बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर कोणत्या स्थितीत हॉस्पिटलमध्ये जाणे आवश्यक आहे ते जाणून घेवूयात…

1. श्वास घेण्यास त्रास –
रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास धोका वाढतो. अशावेळी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा.

2. ऑक्सीजन लेव्हल –
कोरोना संसर्गाचा ऑक्सीजन लेव्हलवर वाईट परिणाम होतो, ही लेव्हल कमी झाल्यास ताबडतोब दवाखान्यात जा.

3. बेशुद्धी किंवा ब्रेन फंक्शनमध्ये समस्या –
कोरोनाच्या अनेक प्रकरणात ब्रेन फंक्शन आणि नर्व्हस सिस्टम प्रभावित होते, असे झाल्यास ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा.

4. छातीत दुखणे –
छातीत दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा.

5. ओठ नीळे पडणे –
कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने अनेक लोकांचे ओठ आणि चेहरा नीळसर होतो. हा ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्याचा संकेत आहे. यास हायपोक्सिया म्हणतात.