Coronavirus : लक्षणं दिसत असताना देखील रिपोर्ट निगेटिव्ह ! कोरोना टेस्ट करताना ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची दुसरी लाट ज्येष्ठांसह मुले आणि तरूणांसाठी सुद्धा घातक ठरत आहे. दिल्लीसह अनेक मोठ्या शहरात अनियंत्रित स्ट्रेनपासून वाचण्याचा प्रयत्न केला जात आहे. हेल्थ अ‍ॅथोरिटीज लोकांना लक्षणांवरून चाचणी करण्याचे आवाहन करत आहे. मात्र, लक्षणे असूनही काही लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अशावेळी चाचणी प्रक्रियेदरम्यान काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

1 कधी करावी टेस्ट –
हेल्थ ऑथोरिटीजनुसार, ताप, अंगदुखी, लॉस ऑफ स्मेल अँड टेस्ट, थंडी लागणे, श्वास घेण्यास त्रास, डोळे लाल होणे, लूज मोशन आणि कानाशी संबंधी लक्षणे दिसल्यास टेस्ट करा.

2 कधी करून नये टेस्ट –
एक्सपर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीला व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेल्यास दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला असेल आणि लक्षणे नसतील तर त्यास रूग्णाच्या संपर्कात आल्यानंतर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही.

3 कोणती टेस्ट करावी –
आरटी-पीसीआर एक गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे, तर आरएटी ’रॅपिड अँटीजन टेस्ट’ कोविड-19 चा ताबडतोब निकाल देते. आरएटी पॉझिटिव्ही रिपोर्ट कोविड-19 ला दुजोरा देतो. परंतु आरएटी रिपोर्ट नेगेटिव्ह असेल आणि तरीसुद्धा रूग्णामध्ये लक्षणे आहेत तर आरटी-पीसीआर करण्याचा सल्ला दिला जातो.

4 सीटी व्हॅल्यू –
सीटी स्कोअर आणि सीटी व्हॅल्यू दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आरटी-पीसीआरमध्ये सीटी व्हॅल्यूचा अर्थ आहे ’सायकल थ्रॅशहोल्ड व्हॅल्यू’ जे रूग्णात व्हायरसच्या लोकडचा एक मार्कर आहे. सीटी व्हॅल्यू जेवढी कमी होईल रूग्णाला धोका तेवढा जास्त असेल.

5 सीटी स्कोअर –
कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर डॉक्टर्स काही रूग्णांकडे छातीचा सीटी स्कॅन मागतात. सीटी स्कॅनमध्ये जास्त सीटी स्कोअर इन्फेक्शनचा जास्त धोका असण्याचा संकेत आहे.

6 कधी असतो इन्फेक्टेड होण्याचा धोका –
हेल्थ एक्सपर्ट म्हणतात, जर तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीशी 6 फुटापेक्षा कमी अंतरावरून सुमारे 15 मिनिटापर्यंत संपर्कात राहात असाल तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते. संक्रमित व्यक्तीपासून दूर रहा आणि बाहेर जाताना मास्क घाला आणि आल्यानंतर हात चांगल्या प्रकारे सॅनिटाइज करा.

7 कोविड-19 झाल्यानंतर काय करावे –
जर तुम्ही कोरोना संक्रमित झाला असाल तर होम क्वारंटाइन किंवा आयसोलेशन वॉर्डमध्ये शिफ्ट व्हा. घरात मुले, ज्येष्ठ किंवा एखाद्या गंभीर आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा.