अपुर्ण राहणार ‘बाबा बर्फानीं’च्या दर्शनाची अपेक्षा, यंदा नाही होणार अमरनाथ यात्रा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाची अमरनाथ यात्रा रद्द केली जाऊ शकते. यावर लवकरच अमरनाथ श्राइन बोर्ड आपला निर्णय जाहीर करू शकतो. त्याचबरोबर सूत्रांच्या माहितीनुसार या वेळी यात्रा होणार नाही. तथापि, श्राइन बोर्डाकडून मात्र याची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. यापूर्वी अमरनाथ यात्रा 23 जून आणि त्यानंतर 21 जुलैपासून सुरू होणार होती, परंतु कोरोना विषाणूमुळे अद्याप ही यात्रा सुरू झालेली नाही. यापूर्वी ही यात्रा थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती.

अमरनाथ बर्फानी लंगर संघटनेतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली असून यात म्हटले आहे की दरवर्षी अमरनाथ यात्रेला दहा लाखाहून अधिक भाविक पोहोचतात. इतक्या मोठ्या संख्येने लोकांच्या आगमनानंतर कोरोना पसरण्याचा धोका निर्माण होईल. अमरनाथ यात्रा सुरू करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. कडक सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वेळी केवळ बालटालमार्गे अमरनाथ यात्रा काढण्याची योजना आखण्यात येत आहे. हेलिकॉप्टरने यात्रेचा विचारही केला जात आहे.

श्राइन बोर्ड करतो व्यवस्था
अमरनाथ यात्रेचे संचालन अमरनाथ श्राइन बोर्डच्या वतीने करण्यात येते. बोर्ड जून-जुलैमध्ये होणाऱ्या या यात्रेसंदर्भात जानेवारीपासून तयारी करण्यात व्यस्त असते. दरवर्षी यात्रा सुरू करण्यापूर्वी राज्यपाल बाबा बर्फानीची प्रथम पूजा करतात. छडी मुबारक पासून या यात्रेला सुरुवात होते.

21 जुलैपासून सुरू होणार होती यात्रा
त्याचबरोबर 21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार असल्याची चर्चाही समोर येत आहे. केवळ 10,000 भाविकांनाच यात्रा करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी अमरनाथ यात्रा फक्त बालटाल मार्गावरून होईल. एका दिवसात केवळ 500 भाविकांना गुहेपर्यंत जाण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच बाहेरून येणाऱ्या यात्रेकरूंना प्रथम कोरोना तपासणी करावी लागेल.